HomeArchiveइन्फिनिक्सने लॉन्च केले...

इन्फिनिक्सने लॉन्च केले आयरॉकर इअरबड्स!

Details
  

 
केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
“स्मार्टफोन निर्माता कंपनी इन्फिनिक्सने स्नोकोर या ब्रँडअंतर्गत आयरॉकर हे वायरलेस इअरबड तयार केले आहेत. स्टाइल, पॅशन आणि इमोशन हे ब्रँडचे डीएनए राखत आयरॉकर हे फ्लिपकार्टवर १४९९ रुपयांच्या लाँच किंमतीत उपलब्ध आहेत.”
 
“स्नोकोर स्थिर कनेक्शनसाठी ब्लूटूथ ५.० ऑफर करते, २० हर्ट्झपेक्षाही कमी न होणारे अनमॅच्ड बास बूस्ट, स्लिप-प्रूफ स्नग फिट गूज एग डिझाइन, २० तासांपर्यंत जास्तीतजास्त प्लेटाइम देणारी दीर्घकाळ टिकणारी क्षमता, सहज वापरण्यासाठी मल्टीफंक्शन बटन कंट्रोल आदी सुविधा यात आहेत. अतिशय स्पष्ट श्रवण गुणवत्तेसाठी इअरबड्समध्ये हाय फिडेलिटी स्पीकर्स आहेत. त्यामुळे संगीत ऐकताना किंवा फोनवर बोलताना अप्रतिम अनुभव येतो. इअरबड्सला सपोर्ट करणाऱ्या गूगल व्हॉइस असिस्टंटमुळे साध्या व्हॉइस कमांडद्वारे फोन नियंत्रित करता येतो.”
 
“प्रत्येक इअरबड्सचे वजन फक्त ४.६ ग्राम असून त्यात आयपीएक्स ४ असते, ज्यामुळे ते हलके बनतात. घाम आणि स्प्लॅशप्रूफ बनतात. यामुळेच ते आउटडोअर अॅक्टिव्हिटिजसाठी परिपूर्ण ठरतात. मग आपण जिममध्ये जॉगिंग करत असू की किक बॉक्सिंग, ते इअरबड्स कोणत्याही हालचालींमुळे घसरणार नाहीत.”
 
“इन्फिनिक्स इंडियाचे सीईओ अनिश कपूर म्हणाले की, इन्फिनिक्स हा आज मध्यम-श्रेणी स्मार्टफोन कॅटेगरीतील एक टॉप ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार म्हणून ऑडिओ सेगमेंटमध्ये वाढ करणे आवश्यकच आहे. म्हणूनच स्नोकोरची निर्मिती झाली. इन्फिनिक्सने फिस्ट (फर्स्ट इन सेगमेंट टेक्नोलॉजी) सुविधा दिली आहे. ज्याद्वारे ग्राहकांना आकर्षक किंमतीत प्रीमियम वैशिष्ट्यांचा अनुभव मिळतो. इन्फिनिक्स ब्रँड अंतर्गत स्नोकरने आमच्या दृष्टीकोनात तसेच या क्षेत्रातील सर्वात आवश्यक वेगळी वैशिष्ट्ये यात दिली आहेत. हे विशेषत: तरुण वर्गाला संतुष्ट करण्यासाठी असून त्यांनी अतिशय स्पष्ट ध्वनीचा अनुभव आणि मनोरंजन तसेच फिटनेससंबंधी कामाचा आनंद घेता येतो.”

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content