Homeचिट चॅटपुण्यातल्या ३ प्रकल्पांसाठी...

पुण्यातल्या ३ प्रकल्पांसाठी झानडू व नाईकनवरे एकत्र!

पुण्यात सुरू असलेल्या तीन प्रकल्पांच्या पोर्टफोलियो साईन-अपसाठी झानडू रियल्टीने नामवंत रियल इस्टेट डेव्हलपर नाईकनवरे डेव्हलपर्स यांच्याबरोबर भागीदारी केली आहे. एमएमआर आणि बेंगळुरू प्रांतात मजबूतपणे पाय रोवल्यावर झानडूने अलीकडेच पुणे रियल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला आहे.

या भागीदारीच्या कक्षेत असलेल्या तीन प्रकल्पांपैकी एक आहे तळेगाव येथील ‘नाईकनवरे निलय’, दुसरा आहे वडगाव मावळ येथील प्रीमियम प्लॉट, अपार्टमेंट, विला आणि बंगल्यांचा आलीशान प्रकल्प ‘ईगल्स नेस्ट’ आणि तिसरा आहे कृषी महाविद्यालयासमोरच्या मुख्य युनिव्हार्सिटी रोडवर असलेला लक्झरी बुटिक कमर्शियल जागा ऑफर करणारा ‘7 बिझनेस स्वेअर’ प्रकल्प.

मोक्याच्या ठिकाणी असलेला नाईकनवरे नीलय हा प्रकल्प तळेगाव रेल्वे स्टेशनपासून जवळ तसेच मुंबई-पुणे महामार्गावर आहे. या गेटेड सोसायटीमध्ये 12-मजली तीन टॉवर्समध्ये मिळून 420 स्मार्ट डिझाइन असलेले अपार्टमेंट्स आणि 22 कमर्शियल सूट्स असून अत्यंत नेत्रसुखद असे डोंगर आणि तलावांचे व्ह्यू तेथून मिळतात. ईगल्स नेस्ट हे एका डोंगरावरील रिझर्व फॉरेस्टच्या जवळ आणि टवटवीत हिरवळीने वेढलेले आहे.

7 बिझनेस स्क्वेअरच्या माध्यमातून नाईकनवरे डेव्हलपर्स आणि झानडू रियल्टी यांनी शिवाजी नगर, या पुणे शहराच्या व्यावसायिक विभागात एक आरामदायक कमर्शियल संकुल आणले आहे. शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 7 बिझनेस स्क्वेअर, या संकुलातून कृषी महाविद्यालयाचा हिरवागार परिसर दिसतो. या संकुलात आहेत सुंदररित्या डिझाईन केलेल्या शोरूम्स आणि ऑफिसेस.

झानडू रियल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास चतुर्वेदी म्हणाले की, पुण्यातील आमचे पहिले क्लायन्ट म्हणून नाईकनवरे डेव्हलपर्स यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही अलीकडेच पुणे रियल इस्टेट बाजारपेठेत प्रवेश केला आहे आणि आम्हाला खात्रीने आहे की, ही भागीदारी झानडू आणि नाईकनवरे दोघांसाठी फलदायी ठरेल.

या भागीदारीच्या माध्यमातून पुणे रियल इस्टेट मार्केटने दाखवलेल्या सकारात्मक कलाचा उपयोग करून घेण्याचे आमचे लक्ष्य आहे. अगदी महामारीच्या काळातदेखील निवासी मालमत्तेची मागणी वाढताना दिसली. त्यामुळे या तिन्ही प्रकल्पांत मागणी वाढवण्याकडे आमचे लक्ष असेल आणि आमच्या या भागीदारीमुळे त्याचे अप्रतिम परिणाम मिळू शकतील.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content