Homeडेली पल्सवरूण सरदेसाईंची संभाव्य...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली आहे.

विलेपार्ल्यात राहणारे यांचे पक्षातले काम काही नाही. आदित्यकृपेने नेते म्हणून युवा सेनेतली त्यांची कारकीर्द. प्रचंड गुर्मी.. कुणाशी साधं बोलताही येत नाही.. अरेरावी संपूर्ण अंगात भिनलेली.. शिवाय तेथे शिवसेना नेते व विभागप्रमुख अनिल परब यांचाही तोच मतदारसंघ आहे. ते वरुण यांच्या उमेदवारीला उघड विरोध करू शकत नाहीत. परंतु ते काही कमी काडीबहाद्दर नाहीत. शिवाय त्यांच्याविरुद्धही असंतोष आहेच. कारण, नेतेपदी निवड झाल्यानंतर आता तब्ब्ल चार वर्षे झाली तरी त्यांना विभागप्रमुखपदाचा मोह आवरत नाही. फेविकॉलसारखे ते त्या पदाला चिकटून बसलेले आहेत, असेही या भागाातल्या शिवसैनिकांमध्ये बोलले जात आहे.

खरंतर काँग्रेसचा हा मतदारसंघ. झिशान सिद्दिकी तेथील आमदार. त्यांच्यावर प्रचंड दबाब टाकून त्यांना येथून माघार घेण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील असल्याचे समजते. परंतु आता बाबा सिद्दिकींच्या हत्त्येमुळे समीकरण बदलले आहे. कुणीही मुस्लिम उमेदवार दिल्यास सहानुभूतीमुळे निवडून येईल कारण येथे मुस्लिम मतदारांची संख्या लक्षात घेण्याजोगी आहे. जुन्या शिवसैनिकांना बोलावून वरुणबरोबर या मतदारसंघात फिरण्याचे फर्मान मातोश्रीने काढल्याचे समजते. बाळा सावंत व श्रीकांत सरमळकर यांचा हा बालेकिल्ला होता. वरुणचे नाव जाहीर झाल्यास एकनाथ शिंदे यांचे काम सोपे होईल, असेही येथील लोकांमध्ये बोलले जाते.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content