Homeटॉप स्टोरीलोकसभा सभापतीपदी ओम...

लोकसभा सभापतीपदी ओम बिर्ला बिनविरोध?

लोकसभेच्या सभापतीसाठी आज सकाळी ११ वाजता निवडणूक होत असली तरी प्रत्यक्षात ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे. या निवडणुकीत ऐनवेळी विरोधी पक्षांचे म्हणजेच काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे उमेदवार काहीतरी कारण उभे करून माघार घेतील आणि निवडणूक बिनविरोध करतील किंवा विरोधक निवडणुकीवर बहिष्कार घालून निवडणूक एकतर्फी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक झालीच तर ती तब्बल २६ वर्षांनंतर होईल. निवडणूक झाली किंवा नाही एनडीएचे उमेदवार ओम बिर्लाच सभापती होतील, हे निश्चित.

सभापतीपदासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी याकरीता गेले दोन दिवस प्रयत्न सुरू होते. मात्र, लोकसभेच्या उपसभापतीसाठी विरोधकांनी आपला उमेदवार असावा असा हट्ट धरला. सत्ताधाऱ्यांकडून तशी तयारीही दाखवण्यात आली. परंतु विरोधकांनी सरकारी पक्षांवर अविश्वास दाखवत उपसभापतीपदाची निवडणूक आधी घेण्याचा आग्रह धरला जो सत्ताधाऱ्यांकडून धुडकावण्यात आला. पर्यायाने निवडणूक बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न फसला आणि सत्ताधाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ सदस्य व मावळत्या लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पुन्हा सभापतीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. एनडीएच्या वतीने बिर्ला यांनी काल आपले नामांकनही दाखल केले. त्यापाठोपाठ काँग्रेसकडून के. सुरेश यांनी सभापतीपदाकरीता आपले नामांकन दाखल केले. विरोधी इंडिया आघाडीकडून ते सभापतीपदाचे उमेदवार आहेत.

६१ वर्षीय ओम बिर्ला राजस्थानच्या कोटा मतदारसंघाचे खासदार आहेत. याच भागातून ते २००३ सालापासून २०१४ सालापर्यंत राजस्थान विधानसभेचे भाजपाचे सदस्य होते. के. सुरेश तथा कोडीकुन्निल सुरेश केरळ काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष आहेत. काँग्रेसकडून थिरूवअनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून ते १९८९ ते १९९७ आणि १९९९ ते २००४ या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. आताही ते याच मतदारसंघाचे लोकसभेचे प्रतिनिधीत्व करतात.

भाजपाप्रणित एनडीएचे २९३ सदस्य असून काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे २३७ सदस्य आहेत. इतर व अपक्ष असे १३ सदस्य आहेत. लोकसभेत सध्या अपक्षांच्या पाठिंब्यासह सत्ताधारी एनडीएला ३०२ सदस्यांचा पाठिंबा आहे. सभापतीपदासाठी मतदान झाले तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधी इंडिया आघाडीची मते फोडण्याचा सत्ताधारी पूर्ण प्रयत्न करेल. यात जर त्यांना यश आले तर या लोकसभेच्या पुढच्या पाच वर्षांत विरोधी आघाडी विस्कळीतच राहील आणि असे चित्र निर्माण होऊ द्यायचे नसेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची.. याप्रमाणे विरोधक ऐनवेळी निवडणूक बिनविरोध करू शकतात, असे जाणकारांना वाटते.

Continue reading

सरकारने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या हातात भरीव मदत देण्याऐवजी अवघ्या पाच हजार रुपयांची घोषणा करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालेली पिके, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न या पाच हजार...

रजेवर भिमनवार; एमपीएससीच्या हंगामी अध्यक्षपदी वाघोले स्वार!

राज्याच्या विधि न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी (प्रभारी) अध्यक्षपदी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नियुक्ती केली आहे. एम.पी.एस.सी.च्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याच्या प्रकरणावरून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी...

राष्ट्रीय स्लिंगशॉट स्पर्धेत गौरव मोकाशींना सुवर्णपदक

१४वी राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धा छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४० ते ४५ वर्षे वयाच्या गटात दहिसर, मुंबईचे गौरव मोकाशी यांनी सुवर्णपदक पटकावले. या आधीच्या राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिपमध्ये त्यांना रौप्यपदक मिळाले होते....
Skip to content