Homeचिट चॅटबिग बॉसच्या सदस्यांमध्ये...

बिग बॉसच्या सदस्यांमध्ये सात-बारावरून होणार का राडा?

गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेल्या मराठी  बिग बॉसच्या घरात रविवारी १५ स्पर्धकांनी भव्यदिव्य ग्रँड प्रीमियर कार्यक्रमाद्वारे प्रवेश केला. यात अभिनेता अविष्कार दारव्हेकर, अक्षय वाघमारे, जय दुधाणे, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, मीनल शाह या कलाकारांप्रमाणेच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, प्रवचनकार शिवलीला पाटील या अन्य क्षेत्रातील महिलांचाही समावेश आहे.

वेगवेगळ्या विचारसरणीच्या या स्पर्धकांमध्ये उद्यापासून घरात काय घडणार, कोणती रणधुमाळी माजतेय, याकडे बिग बॉसच्या तमाम प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

मराठी बिग बॉसच्या पहिल्या दोन सिझनचे होस्ट असलेले दिग्दर्शक महेश मांजरेकर याही,  तिसऱ्या सिझनचे होस्ट आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी होस्टिंगमध्ये रंगत आणण्यासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधव हाही मांजरेकर यांच्यासोबत हजर आहे. मराठी सिरीयलमधील कोल्हापूरकर अभिनेत्री सोनाली पाटील हिने बिग बॉसच्या घरात सर्वप्रथम एन्ट्री घेतली. एन्ट्री घेण्याआधी स्पर्धकांचे बहारदार परफॉर्म पार पडले.

सोनाली पाटीलनंतर सांगलीचा विशाल निकम, स्नेहा वाघ, डॉ. उत्कर्ष शिंदे, मीरा जगन्नाथ, तृप्ती देसाई, अविष्कार दारव्हेकर, सुरेखा कुडची, गायत्री दातार, विकास पाटील, ह.भ.प. शिवलीला पाटील, जय दुधाणे, मीनल शाह, अक्षय वाघमारे, संतोष चौधरी उर्फ दादूस यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.

लेडीज स्पेशल ही या सीझनची थीम असल्याचं महेश मांजरेकर यांनी जाहीर केलं. त्याला अनुसरून महिला स्पर्धकांना बझर दाबून त्यांच्या कामाची निवड करण्यास सांगण्यात आले. यात सोनाली पाटीलला जीमची साफसफाई आणि व्यवस्था सोपवण्यात आली आहे तर स्नेहा वाघला रात्रीच्या किचनचा, मीरा जगन्नाथला बेडरूमच्या साफसफाईचा टास्क देण्यात आला आहे. या कामांचा सात-बारा महिला स्पर्धकांना सोपवण्यात आला. या कामाची जबाबदारी या महिला वर्गाकडे असली तरी पुरुष स्पर्धक हे त्यांचे सेवक असतील.

तृप्ती देसाईंना डीश साफ, स्वच्छ करण्याचे, सुरेखा कुडची यांना किचन आणि बेडरूमची, गायत्री दातार हिला लिव्हिंग रूम, डायनिंगची, शिवलीला पाटीलला गार्डनची तर मीनल शाह हिच्याकडे बाथरूमची व्यवस्था सोपवण्यात आली आहे.

सेवक म्हणून संतोष चौधरी हा जीमची मालकीण सोनाली पवारला तर जय आणि विशाल स्नेहा वाघला मदत करतील. बेडरूमची मालकीण मीरा जगन्नाथ हिला अविष्कार दारव्हेकर तर डिशेशची मालकीण तृप्ती देसाईंना उत्कर्ष शिंदे आणि अक्षय वाघमारे हातभार लावतील. किचन डेची जबाबदारी असलेल्या सुरेखा कुडची यांना संतोष वाघमारे आणि अविष्कार कामात मदत करणार आहेत. लिव्हिंग आणि डायनिंगची मालकीण गायत्रीचा सेवक म्हणून  जय दुधाणे राबणार आहे. गार्डनच्या व्यवस्थेत शिवलीला पाटीलला विकास पाटील मदत करेल. बाथरूमची मालकीण मीनल शाह हिच्यासोबत विकास वाघमारे दिमतीला असेल. 

पाहूया या पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सदस्य गुण्यागोविंदाने राहताहेत की करताहेत सात-बारावरून राडा?

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content