Homeन्यूज ॲट अ ग्लांसआयातुल्लाह खामेनेईंची होणार...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला इराणचे प्रमुख आयातुल्लाह खामेनेई यांची हत्त्या करावी असे वाटत नाही. परंतु आमचा संयम संपतोय… ट्रम्प यांच्या अशा आशयाच्या पोस्टमुळे इराणचे प्रमुख खामेनेई यांची अवस्था इराकचे एकेकाळचे प्रमुख सद्दम हुसैन यांच्यासारखी होईल की काय, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. इस्रायलनेही खामेनेई यांची सद्दामसारखी अवस्था करू, असा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर खामेनेई सत्तेबाहेर होताच संघर्ष थांबेल, असेही त्यांनी म्हटले आहे. इराकचा इस्लामिक क्रांतीकारी नेते व राष्ट्रप्रमुख सद्दाम हुसैन यांची अमेरिकेने ३० डिसेंबर २००६ रोजी इराकच्या एका अत्यंत गुप्त अशा बंकरवर हल्ला करून हत्त्या केली होती.

इराणने निर्माण केलेले अणुबॉम्ब किंवा आण्विक तयारी फोर्डो तसेच नतांज पर्वतराजीत ६० ते ९० मीटर जमिनीखाली चालवली आहे. जमिनीखाली इतक्या खोलवर मारा करण्याची क्षमता इस्रायलकडे नाही. इस्रायलने नतांज परमाणू साईटवर केलेल्या हल्ल्यात इराणच्या दोन इमारती नष्ट झाल्या. या हल्ल्यामुळे आण्विक कार्यक्रमाला होणार वीजपुरवठा खंडित झाल्याचे समजते. मात्र, युरेनियम पार्टिकल्सच्या शुद्धतेला धोका पोहोचला नाही. येथे ८३.७ टक्के शुद्ध युरेनियमचा साठा आहे. परमाणु बॉम्ब बनवण्यासाठी ९० टक्के शुद्ध युरेनियम लागते. त्यामुळेच इस्रायलने इराणवर हल्ला चढवला आहे. इराण, पाकिस्तानसारख्या इस्लामिक राष्ट्रांच्या हाती अणुबॉम्ब असणे यहुदी आणि ख्रिस्ती समाजाला घातक आहे, असे इस्रायलचे म्हणणे आहे. ११ वर्षांपूर्वी इस्रायलचे तेव्हा असलेले प्रमुख नेतन्याहू यांनी पाकिस्तानचाही उल्लेख केला होता. त्यामुळे आता इराणच्या समर्थनाकरीता पाकिस्तानने पुढाकार घ्यावा, असा आग्रह पाकिस्तानच्या सर्वपक्षीय नेत्यांकडून होत आहे. दरम्यान इराणच्या समर्थनार्थ जगातले अनेक मुस्लिम देश एकवटले असून त्यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी व्हावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. जॉर्डनने यामध्ये पुढाकार घेतला असून या दोन्ही देशांमध्ये तातडीने शस्त्रसंधी व्हावी असे आवाहन केले आहे.

कॅनडात होत असलेल्या जी-७ देशांच्या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडाला पोहोचले होते. परंतु बैठक सुरू होण्यापूर्वीच ते पुन्हा अमेरिकेत परतले. त्यानंतर फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रो म्हणाले की, ट्रम्पना इराण आणि इस्त्रायलमध्ये शस्त्रसंधी करायची असेल. तेव्हा ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर पोस्टच करत स्पष्ट केले की, मला त्याहून काहीतरी मोठे करायचे आहे. त्यामुळे अमेरिका या संघर्षात उडी घेणार की काय, अशी चर्चा जाणकारांमध्ये सुरू झाली. वॉशिंग्टनमध्ये परतल्यानंतर टॅम्प यांनी तातडीने त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा ऑथरिटीची बैठक घेतली. एखादा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तरच अशी बैठक घेतली जाते. त्यानंतर ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर इराणला बिनशर्त शरणागती पत्कराण्याचा दम दिला. त्यामुळे अमेरिका या संघर्षात उडी घेणार हे जवळजवळ स्पष्ट झाले.

इराणचा आण्विक कार्यक्रम उद्ध्वस्त करायचा असेल तर अमेरिकेला या संघर्षात उतरावेच लागेल. कारण, अमेरिकेकडेच जमिनीखाली ६० मीटरपर्यंत खोल मारा करणारे १३ हजार किलोपेक्षा जास्त वजनाचे बॉम्ब आहेत. हे बॉम्ब नेऊन अचूक लक्ष्य साध्य करणारी बी-५२ ही लढाऊ विमाने अमेरिकेकडेच आहेत. दरम्यान, अमेरिकेने मध्य आशियामध्ये सहा महिन्यांपासून आपल्या तळांवर युद्धाची तयारी चालवली आहे. समुद्रात विमानवाहू युद्धनौका तैनात केल्या आहेत. यावरून इस्रायलकडून इराणवर होणारा हल्ला अमेरिकेबरोबर, खास करून ट्रम्पबरोबर झालेल्या सल्लामसलतीनंतरच झाला आहे. अमेरिका म्हणते की, आम्ही इराणला ६० दिवस दिले होते. यामध्ये त्यांनी आण्विक कार्यक्रम सोडून देण्याविषयीचा करार करायचा होता. परंतु त्याने ते केले नाही. त्यामुळे आताची परिस्थिती इराणवर ओढवली आहे. आम्ही नेहमीच इस्रायलचे समर्थन करत आलो आहोत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून इराणचे प्रमुख खामेनेई गायब आहेत. एकतर ते देश सोडून परागंदा झाले आहेत किंवा सुरक्षित अशा बंकरमध्ये आहेत. भारतानेही इराणमधल्या भारतीयांना इराण सोडण्याचा सल्ला दिला आहे. आर्मेनिया अत्यंत लहान अशा देशामार्फत हे भारतीय इराण सोडत आहेत.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content