Monday, December 23, 2024
Homeमाय व्हॉईसविधान परिषदेचे सभापती...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी त्यांचा पूर्णवेळ सभापतीपदावर डोळा असल्याने या दिवसांत त्या नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. कारण परिषदेला राष्ट्रवादीची सदस्यसंख्या सर्वाधिक असली तरी पुढल्या केवळ काहीच दिवसांत भाजपा-शिंदे युती संख्याबळात नक्की, निश्चित राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव सेना यांच्यापुढे निघून जाईल. त्यामुळेच विधान परिषद सभापतीपदासाठी उत्सुक व इच्छुक असलेले दोन उमेदवार या दिवसांत त्यातले एक देवेंद्र फडणवीस यांच्याशी तर दुसरे एकनाथ शिंदे यांच्याशी संधान बांधून, संपर्क साधून आहेत. हे शंभर टक्के खरे आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि जावई राहुल नार्वेकर या दोघातली गहिरी मैत्री… त्या मैत्रीचा नेमका फायदा उचलून एका बेसावध क्षणी शरद पवार यांचा डोळा चुकवून आणि अजित पवारांना चकवा देऊन रामराजे नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून मोकळे होतील. अर्थात तत्पूर्वी ते सभापतीपदाचे अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांकडून शब्द घेतील. त्यानंतरच ते भाजपामध्ये प्रवेश घरून मोकळे होतील…

खरी स्पर्धा याच रामराजे निंबाळकर यांना नेमकी डॉ. नीलम गोऱ्हे यांचीच आहे. कारण नीलमताई गोऱ्हेदेखील विधान परिषदेच्या सभापती होण्यास तेवढ्याच इच्छुक आणि उत्सुक आहेत. म्हणूनच त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून नेमके सभापतीपद पदरात पडून घ्यायचे आहे. आजच्या तारखेला रामराजे निंबाळकर आणि डॉ. नीलम गोऱ्हे हे दोघेही भाजपा, शिंदे गटात नाहीत. पण कोणत्याही क्षणी दोघेही त्यांचा राजकीय पक्ष सोडून म्हणजे निंबाळकर पवारांना टाटा करून तर नीलमताई रश्मी ठाकरे यांना फ्लाईंग किस देऊन दोघेही पक्षांतर करून मोकळे होतील.

सभापतीपदाच्या बाबतीत निंबाळकर आणि नीलमताई या दोघातही तुल्यबळ तगडी स्पर्धा आहे. दोघेही त्यांच्या जागी ताकदवान उमेदवार असले तरी विधान परिषदेचे बऱ्यापैकी पावित्र्य राखण्यासाठी निंबाळकर नकोत, नीलम गोऱ्हे अधिक उत्तम आणि संस्कारित सभापती म्हणून नक्की हे राज्य त्यांच्याकडे बघून मोकळे होईल. रामराजे निंबाळकर आणि जावई राहुल नार्वेकर या दोघांच्या हातात अख्खे विधान भवन येणे, नक्की योग्य नाही. चुकीचे घडेल. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून विधान भवनाचे जे पावित्र्य अपवित्र झाले आहे हे असेच पुढे घडले किंवा चुकीच्या नेत्यांच्या आणि बदमाश अधिकाऱ्यांच्या हाती जर हे विधान भवन आले तर नेमक्या चांगल्या विषयांवर न्याय मिळवून देणे उत्तम आमदारांना शक्य होणार नाही…

नीलम

मला आता या क्षणी त्या विधान भवनात सतत घडणाऱ्या भानगडी, वाटाघाटी, व्यवहार, लबाडी अगदी सखोल माहित असली तरी सध्या त्यावर येथे मला काही लिहायचे नाही. फक्त एवढेच सांगतो की विधान भवन परिसरातले वातावरण चांगले नाही. भ्रष्ट आहे. पूर्णतः बिघडलेले आहे. सुषमा अंधारे आल्या आणि तसेही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेतले अनेक, कित्येक आक्रमक नेते अलगद बाजूला काढल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झालेले आहे. विशेष म्हणजे डॉ. नीलम गोऱ्हे आणि रश्मी उद्धव ठाकरे या दोघींमध्ये पूर्वीचे ते प्रेम किंवा जिव्हाळा उरला नाही, राहिलेला नाही. नक्की त्या दोघींत मोठा दुरावा निर्माण झाला असल्याने आणि शिंदे यांच्या माध्यमातून त्यांना परिषदेवर मोठी संधी चालून येत असल्याने नीलमताई उद्धव सेनेतून बाहेर पडून शिंदे सेनेत सामील होतील ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. नीलम गोऱ्हे आणि रामराजे निंबाळकर दोघेही पक्षांतर करून मोकळे होतील हे नक्की आहे. फक्त सभापतीपद नेमके कोणाच्या वाट्याला येते तेव्हढे बघणे आपल्या हातात आहे…

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग...

मान गये उद्धव उस्ताद!!

मराठा आरक्षण आंदोलनाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कंटाळले होते. कारण, या आंदोलनाने त्यांना फार छळले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या मराठा आरक्षण आंदोलनाचा, मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या समस्त नेत्यांनी केवळ बुजगावण्याची भूमिका घेतली आणि आंदोलन बऱ्यापैकी थंडावले....
Skip to content