मुंबई शहर कबड्डी असो.चे माजी खजिनदार व ताडदेवच्या आर्य सेवा मंडळाचे आधारस्तंभ दिगंबर शिरवाडकर यांचे आज, २० जुलै रोजी पहाटे झोपेतच प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. निधनासमयी ते ८७ वर्षाचे होते. काही दिवसापूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते. त्या दुःखातून ते सावरले नाहीत. त्यातच त्यांचा अंत झाला.
शिरवाडकर यांनी जवळपास दोन तपे मुंबई शहर कबड्डी असो.च्या खजिनदारपदाची जबाबदारी सांभाळली होती. कित्येक वर्षे ते ‘मुंबई शहर’चे सदस्यदेखील होते. काही काळ त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चा जमाखर्च लिहिण्याची जबाबदारीदेखील पार पाडली होती.
आर्य सेवा मंडळाची कबड्डी स्पर्धा सातत्याने आयोजित करण्यात वसंत भालेकर यांच्या बरोबरीने शिरवाडकर यांचेही योगदान महत्त्वाचे होते. भालेकर यांच्या निधनानंतर काही वर्ष शिरवाडकर यांनी या स्पर्धा आयोजनाची जबाबदारी एकाकी पार पाडली. शारीरिक शिक्षण मंडळापासून त्यांनी कबड्डी क्षेत्रात आपल्या कार्याला सुरुवात केली. गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.