डिव्हाइन सॉलिटेअर्स हा आघाडीचा डायमंड सॉलिटेअर ज्वेलरी ब्रँड, ऑगस्ट या एकूणच उलाढालीच्या दृष्टीने काहीशा थंड समजल्या जाणाऱ्या महिन्यात उत्साहाची भर टाकण्यास सज्ज झाला आहे. सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या हंगामाचा विचार करता द सॉलिटेअर फेस्टिव्हल ऑफ इंडिया (टीएसएफआय) या महोत्सवाच्या सलग तिसऱ्या वर्षाच्या निमित्ताने भारतातील सर्वात मोठे डायमंड सॉलिटेअर प्रमोशन पुन्हा एकदा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी अभिनेत्री वाणी कपूर या महोत्सवाची ब्रँड ॲम्बेसेडर आहे.
टीएसएफआय या भव्य महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आले असून 200हून जास्त ज्वेलरीची दुकाने या प्रमोशनमध्ये सहभागी होणार आहेत. आगामी सणासुदीच्या व लग्नसराईच्या हंगामाचा विचार करता उत्तम डायमंड सॉलिटेअर ज्वेलरीचे कलेक्शन पाहण्यासाठी ग्राहकांना मोठे आकर्षण असणार आहे.
‘वॉर’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘बेफिक्रे’ यासारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी लोकप्रिय असलेल्या वाणी कपूरच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला प्रचंड यश लाभेल याची आयोजकांना खात्री वाटते. वाणीमुळे या महोत्सवाला स्टार मॅजिक प्राप्त होणार आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 8 मिलियन फॉलोअर्स आहेत. यात बहुतेकजण भारतातील सक्षम तरुण आहेत आणि त्यांच्यामुळे या कॅम्पेनची सगळीकडे चर्चा होणार आहे.
हा वार्षिक महोत्सव 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला असून त्यात भारतातील काही सर्वोत्तम हिरे व्यावसायिकांचे सॉलिटेअर कलेक्शन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या महिन्याभरात भारतातील विविध राज्यांमधील ग्राहकांना त्यांच्या शहरांत तसेच ऑनलाइन स्टोअर्समध्ये सॉलिटेअर ज्वेलरीच्या स्तिमित करणारे कलेक्शन पाहता येणार आहे आणि आपल्या पसंतीचे दागिने निवडता येणार आहेत.
या महोत्सवातील ग्राहकांनी केलेल्या डायमंड सॉलिटेअर ज्वेलरीच्या प्रत्येक खरेदीवर त्यांना निश्चित भेटवस्तू मिळणार आहे. प्रत्येक खरेदीसोबत त्यांना साप्ताहिक ‘लकी ड्रॉ’साठी कूपन मिळणार आहेत. हे ‘लकी ड्रॉ’ 11, 17 आणि 24 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहेत. या ‘लकी ड्रॉ’मध्ये ‘आयफोन’पासून ते ‘अल्टो कार’पर्यंत आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या ग्रँड फिनालेमध्ये 4 सप्टेंबर रोजी ‘बंपर ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. या ‘लकी ड्रॉ’च्या नशीबवान विजेत्याला लक्झरिअस XUV 700 मिळणार आहे आणि इतर विजेत्यांना अतिरिक्त बक्षिसे मिळणार आहेत.
“सणासुदीचा आणि लग्नसराईचा हंगाम आता उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे आणि आमचे भागीदार आणि ग्राहकांसाठी ऑगस्ट हा एक अनूकूल महिना आहे. डायमंड सॉलिटेअर ज्वेलरी घेण्यासाठी टीएसएफआय ही एक उत्तम संधी आहे. आमच्या ग्राहकांना प्रत्येक 8 बदाम व बाण असलेले उत्तम दर्जाचे डायमंड सॉलिटेअर पाहण्याची, अनुभवण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळणार आहेच, त्याचप्रमाणे आकर्षक बक्षिसे जिंकण्याचीही संधी मिळणार आहे, असे डिव्हाइन सॉलिटेअर्सचे संस्थापक जिग्नेश मेहता म्हणाले.
टीएसएफआयच्या 2023मध्ये आयोजित दुसऱ्या आवृत्तीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्याआधीच्या वर्षापेक्षा 2023 मध्ये 600% अधिक ग्राहक या महोत्सवात सहभागी झाले होते. या वर्षी सेन्को गोल्ड, रांका ज्वेलर्स आणि रिलायन्स रिटेल इत्यादी पार्टनर ज्वेलर भारतभरातील ग्राहकांना आकर्षित करून हा विक्रम मोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. टीएफएसआय 2024चे प्रमोशन करण्यासाठी 100हून अधिक शहरांमध्ये डिव्हाइन सॉलिटेअर्स मार्केटिंगचे उपक्रम राबविणार आहेत. यात स्थानिक वर्तमानपत्रांमधील जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यात येईल, प्रभावी रेडिओ कॅम्पेन चालवली जातील आणि सात दिवस देशभरातील चित्रपटगृहांमध्ये जाहिराती चालविण्यात येणार आहेत.