Homeचिट चॅटबालगीतांकडे मुलांना वळविण्याचा...

बालगीतांकडे मुलांना वळविण्याचा अनोखा उपक्रम

जॉनी जॉनी यस पापा..’च्या जमान्यात मुलांनाया बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया..’ या बालगीतांकडे खेचून आणणारा उपक्रम चेंबूर येथील स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये साकारला जाणार आहे. ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता. मंगेश पाडगावकर, ग. ह. पाटील, विजया वाड, निशिगंधा वाड, डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर, एकनाथ आव्हाड अशा ३० प्रथितयश कवितांना गीतांचा साज दिला जाणार असून खासदार अरविंद सावंत या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.

डॉ. विजया वाड, आशाताई कुलकर्णी, विश्वनाथ खंदारे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. विनोद इंगळहळ्ळीकरदेखील यावेळी भेट देतील. आपल्या मराठी साहित्यकांनी लहान मुलांसाठी समृद्ध केलेली साहित्यिक परंपरा परत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अनोखा उपक्रम असून त्यातून साहित्याचा अनुभव घेण्याबरोबरच ती जोपासण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. अधिकाधिक साहित्यरसिकांनी तसेच बालकांनीही यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन डॉ. विजया वाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Continue reading

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्याच्या प्रयत्नात पालिका प्रशासनाकडून ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्याचे निर्देश...

उमेश पाटील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते तर झिशान सिद्दीकी मुंबई अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईत देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री...

के. रवि दादांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते के. रवि (दादा) यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्याच अंदाजात, सर्व स्तरातील लोकांसोबत मुंबईत अरबी समुद्रात, गेट वे ऑफ इंडियावर ताज पॅलेस हॉटेलसमोर एका बोटीवर नुकताच साजरा केला. या वाढदिवस सोहळ्यात 'भाभी जी घर पर हैं'...
Skip to content