Homeमाय व्हॉईस'ट्वेल्थ फेल' झळकला...

‘ट्वेल्थ फेल’ झळकला विधानसभेत…

ट्वेल्थ फेल, हा विधु विनोद चोप्रा यांचा हिन्दी चित्रपट देशभर गाजला आणि ऑस्करसाठी भारताच्या वतीने स्पर्धेत दाखल होणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्र क्याडरचे आपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. लाखो युवकांना प्रेरित करणाऱ्या मनोज शर्मा यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात यावा, अशी मागणी आमदार राम कदम आणि अमीन पटेल यांनी मंगळवारी विधानसभेत केली.  

ही मागणी औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करताना आमदार राम कदम म्हणाले की, ही अनेक आमदारांची भावना आहे. चंबळच्या खोऱ्यात गरीब घरात जन्माला आलेल्या मनोज शर्मा यांनी शिपायाचे काम केले. इंग्रजी चांगले नसल्याने ते बारावीत नापास झाले. त्यांना पिठाच्या गिरणीत काम करावे लागले. संघर्ष करत मनोज शर्मा आयपीएस झाले आणि आज उपायुक्त म्हणून महाराष्ट्रात मुंबईत काम करत आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित ट्वेल्थ फेल हा विधु विनोद चोप्रा यांचा चित्रपट लोकप्रिय झाला. गाजला आणि आता ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेत भारताच्या वतीने जात आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन विधानसभेत केले जावे, अशी मागणी आमदार कदम यांनी केली.

ट्वेल्थ फेल

आमदार अमीन पटेल म्हणाले की, हा चित्रपट गाजला आणि लाखो तरुणांना संघर्षाची प्रेरणा देत आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले जावे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटेल यांना सांगितले की, तुम्ही कामकाज सल्लागार समितीचे सदस्य आहेत आणि समितीच्या बैठकीत तुम्ही हा विषय मांडा. त्याद्वारे उद्या तसा प्रस्ताव तुम्हाला आणता येईल.

देवयानी फरांदे यांचा सुषमा अंधारेंविरूद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव

आमदार देवयानी फरांदे यांनी उबाठा सेनेच्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव मंगळवारी विधानसभेत मांडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यावर तपासून निर्णय घेऊ, असे सभागृहाला सांगितले.

सुषमा अंधारे यांनी २८ नोहेंबरला पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्राच्या आधारे माझ्यावर नाव न घेता आरोप केले, असे फरांदे यांनी विधानसभेत मंगळवारी सांगितले. हे पत्र माध्यमांमध्ये दिले गेले आणि त्यातला माझ्याविषयीचा मजकूर अत्यंत चुकीचा आहे. ड्रग्जडीलर ललित पाटील उबाठा सेनेचे असल्याचे गृहमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले आहे. त्यामुळे माझ्याविषयीची चुकीची माहिती केवळ निनावी पत्राच्या आधारे पत्रकारांना सांगून अंधारे यांनी माझी बदनामी केलेली आहे. वास्तविक, अंमली पदार्थांचा विषय मी स्वतः सातत्याने उपस्थित केलेला आहे. त्यामुळे मी हा हक्कभंग आणत आहे. यासंदर्भातील सीडी आणि पत्र हे दोन्ही मी जोडले आहे आणि अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग आणत आहे, असेही फरांदे यांनी सांगितले.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content