Homeबॅक पेजमान्सूनमध्ये पर्यटकांचा ओढा...

मान्सूनमध्ये पर्यटकांचा ओढा बाली आणि श्रीनगरकडे!

प्रजासत्ताक

पावसाळा कडाक्याच्या ऊनापासून थंडावा व दिलासा देतो. जगातील आघाडीचे ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकडॉटकोडॉटइनच्या नवीन सर्च इनसाइट्सच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिकाधिक भारतीय यंदा मान्सूनमध्ये प्रवास करण्यासाठी (२२.०६.२०२३ – ३१.०८.२०२३ दरम्यान प्रवास) शोध घेत आहेत. या मोसमात भटकंतीचा मनमुराद आनंद घेण्याचे नियोजन भारतीयांनी सुरु केले असून विमानसेवांसाठी सर्वाधिक शोध घेण्यात आलेल्या देशांतर्गत गंतव्यांसंदर्भात गोवा (९ टक्के), नवी दिल्ली (४३ टक्के) आणि श्रीनगर (६४ टक्के) अव्वल तीन स्थानांवर होते. परदेशात सुट्टीचा आनंद घेण्याचे नियोजन करणाऱ्यांसाठी बाली (३५ टक्के), लंडन (११टक्के) आणि टोरोण्टो (२७ टक्के) सर्वाधिक शोध घेण्यात आलेली गंतव्य ठरली.

पावसाळी मोसमासाठी देशांतर्गत विमानसेवा शोधांमध्ये जवळपास ३२ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा शोधांमध्ये जवळपास २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशांतर्गत विमानसेवा मूल्यामध्ये ८ टक्क्यांची आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा मूल्यामध्ये ११ टक्क्यांची सरासरी वाढ झाली असतानादेखील प्रवास करण्याप्रती ओढीमध्ये वाढ दिसण्यात आली आहे.

कायकचे भारतातील कंट्री मॅनेजर तरूण तहिलियानी म्हणाले, ‘‘मान्सून सीझन भारतीय पर्यटकांमध्ये साहसी प्रवासाचा उत्साह जागृत करतो. किंमतीमध्ये वाढ झाली असताना देखील भारतीय पर्यटक मान्सूनचा अधिकाधिक आनंद घेण्यासाठी गोवा व दिल्ली यांसारख्या लोकप्रिय देशांतर्गत गंतव्यांना, तसेच लंडन व बाली यांसारख्या आंतरराष्ट्रीय हॉटस्पॉट्सना ट्रिप्सचे नियोजन करत आहेत. कयकच्या ट्रॅव्हल सर्च व मनी सेव्हिंग टूल्ससह पर्यटक किफायतशीर प्रवासासह संस्मरणीय आठवणी निर्माण करू शकतात.’’

उल्लेखनीय बाब म्हणजे अधिकाधिक भारतीय हॉलिडेमेकर्सची कार भाड्याने घेत स्वत:हून सुट्टीची धमाल घेण्याची इच्छा आहे. २०२२ पासून सरासरी किंमतीमध्ये ३९ टक्क्यांची वाढ झाली असतानादेखील देशांतर्गत गंतव्यांसाठी रेण्टल कार्सकरिता शोधांमध्ये लक्षणीय १०३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी कार्स भाड्याने घेणे अधिक इकोनॉमिकल (किफायतशीर) झाले आहे, जेथे २०२२ पासून सरासरी किंमतींमध्ये १० टक्क्यांची घट झाली आहे, तर शोधांमध्ये जवळपास ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे.

सर्वाधिक शोध घेण्यात आलेल्या गंतव्यांव्यतिरिक्त कयकने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शोधांमध्ये सर्वाधिक वाढ दिसण्यात आलेल्या ट्रेण्डिंग गंतव्यांचेदेखील अनावरण केले. सर्वाधिक ट्रेण्डिंग देशांतर्गत गंतव्य आहेत श्रीनगर (१३,५६७ रूपये), बेंगळुरू (८,९९५ रूपये) व चेन्नई (७,९१२ रूपये), तर आंतरराष्ट्रीय गंतव्य आहेत फुकेत (२६,५७८ रूपये), बाली (३७,२९३ रूपये) आणि लॉस एंजल्स (११७,२८९ रूपये).

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content