Homeचिट चॅटसोन्यात गुंतवणूक करण्याची...

सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ?

सध्या भारतीय गुंतवणुकीचे साधन म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. कारण महागाई आणि चलन अवमूल्यनाच्या संकटात ते मदतीला येते. आता तर केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना गुंतवणुकीच्या अनुषंगाने सोन्यात गुंतवणूक करावी की नाही याबद्दल विश्लेषण करीत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या.

सोनेच का?

सुरुवातीला असे म्हणता येईल की, सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी कोणतीही वेळ चांगली किंवा वाईट नसते. सोने हा सर्वच गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओचा भाग आहे. वैविध्य आणि संतुलनाच्या उद्देशाकरिता याचा वापर होतो. तसेच ही किफायतशीर कमोडिटीदेखील आहे. २००५पासून, सोन्याने ७ पटींनी जास्त परतावे दिले आहेत. तर दुसरीकडे, बीएसई सेन्सेक्सने ५ पटींनी परतावे दिले आहेत. २०२०मध्ये सोन्याने, सोन्यानेच २५ टक्के परतावे दिले.

आर्थिक अनिश्चिततेदरम्यानच, सोन्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे. गुंतवणूकदारांच्या थंब रुलप्रमाणे, सोन्याला १०% वजन दिले जाते. आर्थिक अस्थैर्यात, हे वजन १५% किंवा गुंतवणूकदाराच्या निर्णयानुसार अवलंबून असते. सोने प्रत्यक्ष किंवा डिजिटली विकत घेण्याचा विषय निघतो तेव्हा गुंतवणूकदार अधिक चांगल्या पर्यायांचा आनंद घेतो. डिजिटल पर्यायांमध्ये उपलब्ध असलेला सर्वात चांगला म्हणजे भारतीय सरकारची सोव्हेरियन गोल्ड बाँड स्कीम. यात जोखीम आणि साठवणुकीचे शुल्क नसते, तर गुंतवणूकदाराला लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्समधून सवलतही मिळते.

सध्या, जगभरातील सामाजिक-आर्थिक घटकांमुळे बाजारात अजूनही अस्थिरता कायम आहे. विशेषत: युरोप व अमेरिकेत. कोव्हिड-१९ साथीची लाट पुन्हा आल्याने बाजाराच्या गतीशीलतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोने हा गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. काही अंदाजांनुसार, २०२१मध्येच सोने दोन अंकी परतावे देईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधील सोन्याचे वजन वाढवू इच्छित असाल, तर याचा पुन्हा विचार करा.

गुंतवणूकदाराने इतर कोणत्या पर्यायांचा विचार केला पाहिजे?

पिवळा धातू किंमतीनुसार खरोखरच उपयुक्त असतो. सध्या त्याची किंमत १० ग्राममागे ५००००पेक्षा जास्त आहे. अशा वेळी गुंतवणूकदार चांदी विकत घेण्याचाही विचार करू शकतो. तिचा दर ६६,००० प्रति किलो एवढा आहे. तथ्यांचा विचार करता, सोन्याने मागील वर्षात २५ टक्के परतावे दिले तर चांदीने ५० टक्के. त्यामुळे चांदीदेखील गुंतवणूकदारांसाठी अधिक फायद्याची ठरू शकते.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे चांदीमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने फार पर्याय उपलब्ध नाहीत. तुम्ही ती फक्त प्रत्यक्षपणेच खरेदी करू शकता. त्याची खरेदी आणि साठवणुकीचा मुद्दा ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.

अखेरीस, सध्या चलनात असलेल्या विस्तृत आर्थिक घटकांमध्ये तुम्ही मौल्यवान धातूंना जास्त वजन दिलेच पाहिजे. सध्या अस्थिर अससलेल्या बाजारपेठेत तुमच्या पोर्टफोलिओसाठी हे संतुलन साधणारे ठरेल. त्याचवेळी त्यात गुंतवणूक करतना तुम्हाला उत्कृष्ट परताव्यांचा आनंदही मिळेल. सोने हा भारतीयांसाठी आणखी अभिमानास्पद घटक आहे. तथापि, तुम्ही या प्रतिष्ठेसाठी गुंतवणूक करणार नाहीत तर, परताव्यांसाठी गुंतवणूक करत आहात. त्यामुळे शक्य झाल्यास चांदीचा पर्याय निवडा.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content