Homeचिट चॅटवाय-फाय नव्हे, तर...

वाय-फाय नव्हे, तर आता शिखरांवर पोहोचणार लाय-फाय नेटवर्क!

स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख ही संस्था लाइट फिडेलिटी या (लाय-फाय) तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरनेट कनेक्शन असलेली पहिली संस्था बनली आहे.

Li-Fi technology optical wireless communication interior visualization flat style concept web vector illustration. Office room and led lights data transfer. Creative people collection.

एनएव्ही वायरलेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडने (नावटेक) स्थानिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी भारताच्या सर्वोच्च उंचीच्या ठिकाणी असलेल्या लडाख येथील शैक्षणिक संस्थेत लाय-फाय नेटवर्कची स्थापना केली आहे. या लाय-फायमुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक हेतूंसाठी उपलब्ध विजेवर जलद आणि सुरक्षित इंटरनेट मिळणार आहे.

नाव वायरलेस टेक्नॉलॉजीज ही आशियातील लाय-फाय क्षेत्रातील एकमेव नोंदणीकृत कंपनी आहे. याबाबत बोलताना संबंधित संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सोनम वांगचुक म्हणाले की, आमच्या कॅम्पसमध्ये नाविन्यपूर्ण लाय-फाय तंत्रज्ञानाचा वापर करून कायमस्वरूपी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची स्थापना पाहून आनंद झाला. यामुळे ऑनलाईन व्याख्याने आयोजित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी संस्थेला फायदा होईल. हे तंत्रज्ञान पर्यावरणासही अनुकूल आहे.

लाय-फाय

प्रकल्पामागील हेतू स्पष्ट करताना नावटेकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी हार्दिक सोनी म्हणाले की, भारताच्या सर्वोच्च ठिकाणी असलेल्या शैक्षणिक संस्थेत लाय-फाय तंत्रज्ञान स्थापित केल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही या प्रकल्पासाठी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता आणि ते अत्यंत जलद, सुरक्षित आणि स्वस्त इंटरनेट प्रदान करण्याच्या अशा अभिनव कल्पनेने प्रभावित झाले. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्त्वाखाली, आम्ही संपूर्ण लडाख कव्हर करण्यासाठी एकत्र येऊ आणि या लाय-फाय नेटवर्कची संपूर्ण परिसरात जोडणी करू.

 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content