Homeचिट चॅटक्रिप्टोकरन्सी व्यवहारांत महिलांचे...

क्रिप्टोकरन्सी व्यवहारांत महिलांचे प्रमाणही लक्षणीय!

भारतातील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज, वझीरएक्सने भारतातील टीअर २ आणि टिअर ३ शहरांमधून यूझर्सच्या साइनअपमध्ये २६४८% वृद्धी अनुभवली. दरम्यान, निष्कर्षांमधील सर्वोत्तम घटकांपैकी एक म्हणजे टिअर २ आणि टिअर ३ शहरांतील महिलांचा क्रिप्टोच्या समुहात समावेश झाला.या भागातील महिला देशातील एकूण महिलांच्या साइनअपपैकी ६५% आहे.

वझीरएक्सने काही महिला ट्रेडर्सशी संपर्क साधला. त्या म्हणाल्या की, क्रिप्टोने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात तसेच जीवनमान उंचावण्यास मदत झाली. तसेच कुटुंबासाठी दुय्यम उत्पन्नाचा मोठा स्रोतही जोडला गेला.

एक्सचेंजमध्ये ७.३ दशलक्षांपेक्षा जास्त यूझर्स असल्याचे आणि २०२१मध्ये आजपर्यंतचा सर्वाधिक २१.८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त व्यापार झाल्याचे कंपनीने सांगितले. टिअर २ आणि टिअर ३ शहरांनी २०२१मध्ये वझीरएक्सवर एकूण साइनअपमधील जवळपास ५५% वाटा उचलला असून त्यामुळे त्यांनी टिअर १ शहरांना मागे टाकले आहे. त्यांनी २३७५%ची साइनअप वाढ दर्शवली. भारतातील प्रमुख ऑनलाईन पेमेंट गेटवे- रॅझॉरपेच्या अहवालानुसार, टिअर २ व टिअर ३ शहरांनी प्लॅटफॉर्मवर २०२०मध्ये ५४% डिजिटल ट्रान्झॅक्शन दर्शवले. याद्वारे वर्षभरात ९२% वृद्धी नोंदवली.

सतत कमी होत असलेल्या स्मार्टफोनच्या किंमती तसेच स्वस्त व वेगवान इंटरनेटचा प्रवाह यामुळे निमशहरी भाग आणि ग्रामीण भागांमध्ये वेगाने इंटरनेटचा वापर होत आहे. महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनने या भागातील डिजिटलचा स्वीकार आणखी वेगाने झाला. तसेच भारतातील क्रिप्टो स्वीकारण्याचे सर्वाधिक लोकही येथेच आहेत. कारण यामुळे लोक ऑनलाईन उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्याचा तसेच त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

याचठिकाणी ते बिटकॉइनसारख्या जागतिक मालमत्तेत प्रवेश करतात. येथे जगाच्या कोणत्याही भागातून गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे, अहमदाबाद, लखनौ, पाटणा यासारख्या टिअर २ शहरांमध्ये २९५०% वाढ झाली तर रांची, इंफाळ, मोहाली यासारख्या टिअर ३ शहरांनी वझीरएक्सवर २४५५५% ची सरासरी वृद्धीची नोंद केली.

वझीरएक्सचे सीईओ निश्चल शेट्‌टी म्हणाले की, क्रिप्टोमध्ये ग्रामीण भारतातील आर्थिक समस्या दूर करण्याची आणि भांडवल सहजपणे मिळवणे, जास्त ऑनलाईन नोकऱ्या उपलब्ध करण्याची प्रचंड क्षमता आहे. वझीरएक्स येथे, एक सुरक्षित क्रिप्टो इकोसिस्टिम तयार करत देशाला डिजिटल सशक्त समाज आणि ज्ञानवादी अर्थव्यवस्थेत रुपांतरीत करत आहे. डिजिटल इंडियाची मोहीम पुढे नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content