Homeकल्चर +'कोवळी उन्हे'चा ३००वा...

‘कोवळी उन्हे’चा ३००वा प्रयोग थाटामाटत संपन्न!

कथा, कविता, एकपात्री, गीते अशा स्वलिखित साहित्यप्रकारांचे सादरीकरण करून मनोरंजन करणाऱ्या मेघना साने यांच्या देशपरदेशात लोकप्रिय झालेल्या ‘कोवळी उन्हे’ कार्यक्रमाचा ३००वा प्रयोग सहयोग मंदिर सभागृहात नुकताच संपन्न झाला. यावेळी मेघना साने लिखित ‘ॲडजस्टमेंट’ या कथासंग्रहाचे व ‘गुणीजनांचे कलाविष्कार’ या लेखसंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.

पुस्तक प्रकाशनापूर्वी रसिकांच्या मनोरंजनासाठी ‘कोवळी उन्हे’ कार्यक्रम सादर करताना मेघना साने यांनी आपल्या नव्याने प्रकाशित होणाऱ्या ‘ॲडजस्टमेंट’ या कथासंग्रहातील नात्यांचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली. हेमंत साने व आकांक्षा पालकर यांनी मेघना साने रचित व हेमंत साने यांनी संगीतबद्ध केलेले ‘तुला हवे मला हवे’ हे गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. कार्यक्रमानंतर लगेचच वरील दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

डिम्पल पब्लिकेशनचे मेघना साने लिखित ‘ॲडजस्टमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते झाले. डॉ. अरुंधती भालेराव यांनी मेघना साने यांच्या ‘ॲडजस्टमेंट’ या पुस्तकातील कथांवर विवेचन केले. डिम्पल प्रकाशनचे कौतुक मुळे याप्रसंगी उपस्थित होते. उद्वेली बुक्सचे विवेक मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले आणि हेमंत साने यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी रसाळ शैलीत केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. अनंत देशमुख, ‘राज्ञी’च्या वैशाली गायकवाड, ‘न्यूज स्टोरी टुडे’चे संपादक देवेंद्र भुजबळ, ‘ठाणे वैभव’चे मिलिंद बल्लाळ, नृत्यगुरू डॉ. किशू पाल, चित्रकार व लेखक रामदास खरे, कवी विकास भावे, शैला खांडगे यांची विशेष उपस्थिती लाभली.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content