Homeचिट चॅटमालवणी महोत्सवाच्या माध्यमातून...

मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेने फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी एका बाजूला शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली असतानाच त्याचाच एक भाग म्हणून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील अनंतराव भोसले मैदानावर काल रात्रीपासून सुरु झालेल्या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेच्या उबाठा गटाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर, शिक्षक आमदार जगन्नाथ अभ्यंकर, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर आदींनी याठिकाणी पालखी आणि पूजा करण्यात आलेल्या देव गिरोबाला मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी मुंबईकरांना बुद्धी दे, असे गाऱ्हाणे घातले.

मालवणी

शाखा क्रमांक १४तर्फे आणि शाखा क्रमांक १२ व मागाठाणे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काल रात्रीपासून भोसले मैदानावर मालवणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता परंपरेप्रमाणे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील श्री देव गिरोबा मंदिराच्या प्रतिकृती आणि बालनगरी व बाजारपेठेचे महाआरती तसेच पारंपारिक गाऱ्हाणे घालून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मागाठाणे मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिवसेना (उबाठा) पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर रंगमंच, मागाठाणे मित्र मंडळाचे संस्थापक, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य स्वागत कक्ष तसेच या मालवणी महोत्सवात कोकणी संस्कृती आणि खाद्यपदार्थांची रेलचेल विविध उद्योजकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोकणी खाद्यपदार्थांची मेजवानी आणि त्यांचा घमघमाट लोकांना आकर्षित करीत आहे. रोज सायंकाळी ७ वाजतां श्री देव गिरोबाची वाजंत्री तरंगासह पालखी आणि रात्री ८ वाजता दशावतार नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्सवप्रमुख नंदकुमार मोरे यांनी दिली. रविवार, १२ जानेवारीपर्यंत हा महोत्सव होत आहे.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content