Homeकल्चर +'देवमाणूस'च्या स्टार-स्टडेड कलाकारांमध्ये...

‘देवमाणूस’च्या स्टार-स्टडेड कलाकारांमध्ये सुबोध भावे ऑनबोर्ड!

तेजस देऊस्कर दिग्दर्शित देवमाणूस, या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या एक से एक कलाकारांच्या टीममध्ये आता अभिनेते सुबोध भावे सामील झाले आहेत. अभिनेता सुबोध भावे, महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दिग्गज कलाकारांसोबत यंदा स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे, ज्यात आकर्षक आणि उच्च दर्जाचे नाटक संपूर्ण महाराष्ट्र आणि बाहेरील प्रेक्षकांना आकर्षित करेल आणि अनुभवायला मिळेल.

बालगंधर्व, आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर, कट्यार काळजात घुसली, यासारख्या चित्रपटांतील त्यांच्या अविस्मरणीय अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले सुबोध भावे, ज्यांची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे, जे नेहमी आपल्या प्रत्येक भूमिकांमध्ये स्वतःला बुडवून घेण्याची क्षमता ठेवतात, कॉम्प्लेक्स, स्टेबल यासारख्या विविध लेव्हलची पात्रे साकारण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल त्यांचं अनेकदा कौतुक झालं आहे आणि त्यांचा हा समावेश आणि योगदान नक्कीच चित्रपटाच्या कथेला एक नवीन आयाम देईल, असे बोलले जाते.

देवमाणूसच्या कलाकारांसोबत सामील होण्याबद्दल अभिनेता सुबोध भावे म्हणाले की, मला यापूर्वी दिग्गज अभिनेता महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या दोघांसोबत स्वतंत्रपणे चित्रपटात काम करण्याचा बहुमान मिळाला आहे. परंतु देवमाणूसमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यासोबत एकत्र काम करणे हा खरोखरच माझ्यासाठी एक रोमांचक अनुभव आहे. या अविश्वसनीय चित्रपटाचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि आमचे सामूहिक प्रयत्न पाहून प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो हेसुद्धा पाहण्यासाठी मी आतुर आहे.

देवमाणूस, या चित्रपटाचे इतर तपशील जरी गुपित असले तरी, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच एकप्रकारची कास्टिंगची माहिती देऊन निश्चितच या सिनेमासाठी प्रेक्षकांची आवड निर्माण केली आहे.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content