Friday, April 18, 2025
Homeएनसर्कलपरळीत 21 ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी...

परळीत 21 ऑगस्टपासून राज्यस्तरीय कृषी महोत्सव

महाराष्ट्राच्या कृषी विभागातर्फे येत्या 21 ऑगस्टपासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी महोत्सवात कृषी तसेच पशु प्रदर्शनाबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध, विविध आधुनिक उपकरणे खरेदी करता यावे, शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती मिळावी यादृष्टीने महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 21 ऑगस्टला दुपारी 12 वा. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

महोत्सव

या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने विविध आधुनिक यंत्रसामुग्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, नवनवीन संशोधन, चर्चासत्रे तसेच विविध उत्पादने, पशूंच्या विविध प्रजाती यासह अनेक कृषी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

मुंडे यांनी परळीतील शासकीय विश्रामगृहात या कृषी महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, कृषी विभागाचे सहसंचालक दिवेकर, मोटे आदी उपस्थित होते. परळी शहरातील बाजार समिती मैदानावर सुरु असलेल्या कृषी महोत्सवाच्या तयारीचीही मुंडे यांनी पाहणी केली. मुख्य कार्यक्रमासाठी उभारण्यात येत असलेला मंडप, आसनव्यवस्था, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येत असलेले शेकडो स्टॉल्स, पार्किंगव्यवस्था, भोजनव्यवस्था, सुरक्षा आदी सर्व बाबींची पाहणी करून सर्व व्यवस्थापन चोखपणे करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Continue reading

पोराचा बाजार उठला रं…

जिओ स्टुडिओज प्रस्तूत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं शीर्षकगीत रिलीझ करण्यात आलं. त्यापाठोपाठ आता याच चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं..' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सूरज चव्हाण, जुई...

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६...

इरेडाने जाहीर केला 1,699 कोटींचा निव्वळ नफा!

एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी ठरली पहिली कंपनी ठरतानाच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (इरेडा) 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 1,699 कोटी रुपयांचा करपश्चात म्हणजेच निव्वळ नफा जाहीर केला आहे. कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी त्यांचे...
Skip to content