Thursday, September 19, 2024
Homeमाय व्हॉईसदक्षिण अमेरिका म्हणजे...

दक्षिण अमेरिका म्हणजे ‘पाताळ’च!

दक्षिण अमेरिका म्हणजेच ‘पाताळ’ असा लेखकाचा दृढविश्वास आहे आणि आपल्या पुराणांप्रमाणे बळीराजा पाताळात गेला; म्हणजेच अगदी निश्चितपणे दक्षिण अमेरिकेत गेला. लेखक अनिल ज. पाटील याच्या पाताळयात्रा, या पुस्तकाचा हा गाभा आहे.

काय आहे या पुस्तकात?

ह्या कथेचा मुख्य भाग (थीम) बळीराजा पाताळात म्हणजे अमेरिकेत गेला; तो समुद्रमार्गे, आणि मय, शंबरादी प्रभृती रशिया, सैबेरिया-अलास्का असे भूमार्गाने पाताळात गेले, हे अगदी सत्य आहे. ह्याचे भरपूर पुरावे कथेच्या ओघात जेथल्या तिथेच लगेचच दिले आहेत.

‘स्वर्ग’ म्हणजे ‘त्रिविष्टप’ म्हणजेच आजचे तिबेट होय. नकाशात उत्तर वर दाखवतात; म्हणून कदाचित स्वर्ग वर बोट करून दाखवत असावेत. इथपर्यंत ठीक आहे; पण ‘त्रिविष्टपम’ म्हणजे तीन घड्या असलेला असा अर्थ आहे. आणि भूगर्भशास्त्रज्ञांना हे माहीत आहे की, तीन मोठ्या भूकंपांमुळे तिबेटचा भूगर्भ तीन वेळा अक्षरशः पिळला गेला आहे!

दक्षिण अमेरिकेतील पेरू येथील नगण्य कंपनीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी तीन विलक्षण बुद्धिमान भारतीय इंजिनियर्स निघतात आणि अचानक… अचानक मती गुंग करणारा अपघात होतो. तर्काला आव्हान देणारी कलाटणी मिळते. दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृती एखाद्या गूढासारखी छळत राहते. भूत, भविष्य, वर्तमानकाळाची संकल्पना विसरली जावी अशा घटना घडत जातात. एका अनोख्या अनुभवाचे दालन उघडून, कृष्णविवरामध्ये गतिमान होऊन स्वतःचे अस्तित्त्व विसरायला लावणारी ही ‘पाताळयात्रा’.

हा पंधरा हजार वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास शास्त्रीय पुरावे देऊन मांडला आहे. अतिशय परिश्रमाने सचित्र पुरावे जमवले आहेत हे परिशिष्टावरून लक्षात येते. म्हणून बळीराजाची कथा ही पुराणातील ‘वांगी’ न राहता वास्तुनिष्ठ इतिहास झाली आहे. परंतु ही ललित कृती असल्याने ‘भरतकाम’ भरपूर आहे. पण लेखकाने मूळ संकल्पनेला बाधक गोष्टी जबाबदारीने टाळल्या आहेत. विषयाच्या गांभीर्याबद्दल लेखक सतत सतर्क राहिले आहेत. शेवटी दिलेली संदर्भग्रंथ सूची अभ्यासकांसाठी खूपच उपयुक्त आहे. कादंबरी इतकी उत्कंठावर्धक झाली आहे की बसल्या बैठकीत वाचल्याशिवाय राहवत नाही.

पाताळयात्राः

लेखक: अनिल ज. पाटील

प्रकाशक: उन्मेष प्रकाशन, पुणे

मूल्य: ३५०/- रुपये

सवलत मूल्य: ३१५/- रुपये

टपालखर्च: ५०/- रुपये

संपर्क: ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

पाताळ

Continue reading

इतिहास पुसून टाकता येत नाही, फक्त विसरता येतो!

इतिहास पुसून टाकता येत नाही, बदलताही येत नाही, मात्र... इतिहास विसरता येतो! हाच विसरलेला इतिहास सांगण्याचे काम बाबू गंजेवार यांनी केला आहे. कोणता इतिहास आपण विसरलो? तो इतिहास आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा! भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक लखलखते पर्व म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्राम। बघता...

पातंजलयोगदर्शन आणि निरंतर साधना!

पातंजलयोगदर्शन - निरंतर साधना, हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. काय आहे या पुस्तकात? इ.स. अकराव्या शतकात होऊन गेलेल्या राजा भर्तृहरी यांचे ऋषी पतंजलींविषयी दोन ओळींचे एक स्तोत्र आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचां। मलं शरीरस्य च वैद्यकेन। योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां। पतंजलीं प्रांजलिरानतोऽस्मि।। योगाने...

निसर्गस्नेही दांपत्याचे वाचनीय पुस्तक स्वप्नामधील गावां… 

पुस्तक परिचयासाठी 'स्वप्नामधील गावां...', हे पुस्तक हाती घेतले आणि वाचायला सुरुवात केली. दिलीप व पौर्णिमा कुलकर्णी यांचे हे अनुभवकथन वाचताना एक वेगळ्याच भावविश्वात आपण वावरतो. त्यांच्यासारखं जीवन आपण जगू शकतो का, असा प्रश्न आपल्या मनात येतो. या प्रश्नाचं उत्तर...
error: Content is protected !!
Skip to content