Homeचिट चॅटगर्भनिरोधक दिनानिमित्त सोनालीने...

गर्भनिरोधक दिनानिमित्त सोनालीने दिला खास संदेश!

आज जागतिक गर्भनिरोधक दिन! या दिनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने जागरूकतेचा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. सर्व जोडपी आणि व्यक्तींमध्ये मुक्तपणे व जबाबदारीने त्यांच्या मुलांची संख्या व त्यामधील अंतराबाबत निर्णय घेण्याच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी हा व्हिडिओ जारी केला आहे. मॅनकाइण्ड फार्माच्या अधिपत्याखालील रेग्युलर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह अनवॉन्टेड-२१ डेजच्या माध्यमातून सोनाली, गर्भनिरोधक दिनाबाबत जागरूकता निर्माण करत आहे.

या व्हिडिओ संदेशामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका जोडप्याच्या त्यांच्या बाळाबाबत नियोजन करण्याच्या वैयक्तिक निवडीबाबत सांगत आहे. अभिनेत्री सांगते की, ज्याप्रमाणे व्यक्ती त्यांचा आहार, कपडे, व्यावसायिक जीवन व मित्र यांची स्वत:ची आवड व पसंतीनुसार निवड करतात, अगदी त्याप्रमाणेच त्यांना कुटूंब नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे. या व्हिडिओ संदेशामध्ये ती सागतेय की गर्भधारणा ‘नकळतपणे’ नाही तर ‘स्वेच्छेनुसार’ झाली पाहिजे. सर्व सोशल मीडिया व्यासपीठांवर हा व्हिडिओ संदेश दाखवला जात आहे.

‘अनवॉन्टेड–२१ डेज टॅब’ ही गर्भधारणा उशिराने करण्याची किंवा पुढील बाळामध्ये अंतर ठेवण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी सुलभ, गुणकारी व सुरक्षित प्रतिवर्ती गर्भनिरोधक गोळी आहे.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content