Homeमुंबई स्पेशलमुंबईत पालिकांच्या शाळेत...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काल गोखले रोड (दादर) शाळेत सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गखोल्यांना भेट दिली. स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेला वाव मिळेल. तसेच सोप्या पद्धतीने संकल्पना आत्मसात करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संदीप सांगवे, प्रशासकीय अधिकारी (‌शाळा) स्नेहलता डुंबरे तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते. पालिकेच्या १८१ शाळांमध्ये १८१ स्मार्ट टेलिव्हिजन तसेच ‌शैक्षणिक संकल्पना आधारित उपकरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणित तसेच इंग्रजी भाषेतील संकल्पना चलचित्रपटाच्या माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजनवर

मांडणे शक्य होणार आहे. दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी १८१ शाळांमधील प्रत्येकी एक यानुसार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक विभागाच्या शिक्षकांची निवड या प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे.

छोट्या वारकर्‍यांसोबत आयुक्त

आषाढी एकादशी वारीनिमित्त छोट्या वारकर्‍यांच्या दिंडीचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. या दिंडीत छोट्या वारकऱ्यांसोबत प्रशासक गगराणी यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषेची त्यांनी आवर्जून विचारपूस केली. दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी छायाचित्रही घेतले. पालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी “आनंददायी शनिवार” या उपक्रमाअंतर्गत अक्षर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content