Homeडेली पल्सशाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची...

शाळकरी मुलांसाठी गुंतवणुकीची सर्वात छोटी SIP योजना लाँच

शाळकरी मुलांना म्युच्युअल फंडाच्या दरमहा गुंतवणूक योजनांच्या (SIP) माध्यमातून शेअर मार्केटशी जोडणारी “तरुण” योजना लाँच करण्यात आली आहे. यातून दरमहा 250 रुपयांपासून गुंतवणूक करणे शक्य होणार आहे. भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि भारतीय म्युच्युअल फंड संघटना म्हणजेच असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) यांच्या सहकार्याने ही योजना राबविली जाणार आहे.

250₹ दर महिना म्हणजेच साधारणतः 8 रुपये रोज इतक्या कमी रकमेपासून गुंतवणुकीची संधी देणारी ही आजवरची सर्वात छोटी SIP योजना लाँच करण्यात आली आहे. शालेय स्तरापासून आर्थिक साक्षरता उपक्रम राबविणे, हा यामागील उद्देश असल्याचे AMFI, “ॲम्फी”चे चेअरमन नवनीत मुनोत यांनी सांगितले. त्यासाठी MITRA पोर्टलही लाँच करण्यात आले आहे. मार्चपासून मित्रा पोर्टल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना शेअर मार्केटशी जोडणारा हा तरुण SIP चा फायनान्शिअल लिटरसी उपक्रम सुरुवातीला देशातील 9 जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार आहे. विविध शाळांतील शिक्षकांनाच प्रशिक्षण देऊन आर्थिक साक्षरता उपक्रमाची जबाबदारी देण्यात येणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा राबविल्या जाणार असून विजेत्यांना 100 रुपये दरमहिना असे 24 महिन्यांसाठी SIP योजनेचेच बक्षीस दिले जाणार आहे. या उपक्रमातील सर्व योजनांना 2 वर्षे लॉकइन कालावधी राहील, ज्या काळात योजनेत गुंतवलेले पैसे काढून घेता येणार नाहीत. “ॲम्फी”च्या गुंतवणूकदार निधीतून हे उपक्रम राबविले जाणार आहेत.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content