Tuesday, March 11, 2025
Homeचिट चॅटठाणे डीएस‌ओ‌‌‌ खो-खो...

ठाणे डीएस‌ओ‌‌‌ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकूट

श्री मावळी मंडळ संस्था, क्रीडा व युवक संचालनालय  महाराष्ट्र राज्य व ठाणे महानगर पालिका, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे डीएसओ आंतर‌ शालेय खो-खो स्पर्धेत यजमान श्री‌ मावळी मंडळाच्या शालेय संघाने शानदार कामगिरी करताना तिहेरी मुकुटाचा मान‌‌ नुकताच मिळविला.

ह्या स्पर्धेसाठी श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे शतक वर्षानिमित्त सर्व खर्च करण्यात आला. ह्या स्पर्धेमध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने, १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने आणि १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने जेतेपदाचा मान‌ मिळविला. ह्या तिन्ही संघांची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ह्या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुले व मुली, १४ वर्षांखालील मुले व मुली असे ४ गट होते. प्रत्येक गटात ठाण्यातील जवळपास ६० शाळांनी भाग घेतला होता.

१७ वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामन्यामध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलने सहकार विद्या मंदिर, कळवा या शाळेचा आरामात पराभव करून विजेतेपद मिळवले. ह्या सामन्यात श्री मावळी मंडळ हायस्कूलने ७ गडी टिपले तर सहकार विद्या मंदिर शाळेने ३ गडी टिपले. श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या आयुष सोनवणे ह्याने ३ मिनिटे, स्वरान  जाधव ह्याने १ मिनिटे आणि सोहम ठाकूर ह्याने नाबाद 1 मिनिटे संरक्षण करुन पळतीचा छान खेळ केला.

१७ वर्षांखालील मुलींच्या गटातील अंतिम समन्यामध्ये श्री मावळी मंडळ हायस्कूलने न्यू कळवा  हायस्कूलचा सहज पराभव केला. श्री मावळी मंडळ हायस्कूलने ५ गडी टिपले तर न्यू कळवा हायस्कूलने ३ गडी टिपले. श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या संस्कृती जाधव, अद्विका चव्हाण आणि अंतरा कदमने अष्टपैलू खेळ करून त्यांच्या विजयात‌ मोठा‌ वाटा उचलला.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटात निर्णायक लढतीत श्री मावळी मंडळ हायस्कूलने लक्ष्मी विद्यालयाचा डावाने दणदणीत पराभव केला. ह्या सामन्यात श्री मावळी मंडळ हायस्कूलने ११ गडी टिपले तर लक्ष्मी विद्यालयाने ५ गडी टिपले. श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या अभिराज वाळंज ह्याने नाबाद २ मिनिटे संरक्षण करून ३ गडी बाद करून‌ शानदार  अष्टपैलू खेळ केला. पार्थ मायनांक ह्याने २ मिनिटे संरक्षण केले व भार्गव शिंदे ह्याने १ मिनिटे संरक्षण करून १ गडी बाद करत आपल्या संघास विजय संपादन करून देण्यात मोठी भूमिका बजावली.

श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या संघाला प्रशिक्षक ‌प्रणय कमले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेचा समारोप रीमा देवरुखकर (क्रीडा अधिकारी ठा. म.पा. व छत्रपती शिवाजी पुरस्कारप्राप्त) ह्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, विश्वस्त रवींद्र आंग्रे, विश्वस्त केशव मुकणे, कार्यकारिणी सदस्य भगवान शिंदे, नरेंद्र पाठक (श्री मावळी मंडळ हायस्कूलचे CEO), रोशन वाघ (श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या  माध्यमिक विभागाचे मुख्य), आदिती हवालदार (श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या  प्राथमिक विभागाचे मुख्य) आणि नीता मिरकर (श्री मावळी मंडळ हायस्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे मुख्य) हेदेखील उपस्थित होते.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content