Homeचिट चॅटसव्यासाची सावरकर अभ्यासक...

सव्यासाची सावरकर अभ्यासक डॉ. प्र. ल. गावडे कालवश

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पहिल्यांदा प्रबंध लिहिणारे संशोधक, अभ्यासक, पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, मुख्याध्यापक, उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ, पुणे विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम केलेले तसेच पाठ्यपुस्तक मंडळावरही संपादकपदी राहिलेले विद्यावाचस्पती शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. प्र. ल. गावडे यांचे दीर्घ आजाराने आज, सोमवारी दि. २ ऑगस्ट २०२१ रोजी पहाटे निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते.

त्यांचे पूर्ण नाव प्रभाकर लक्ष्मण गावडे असे असून त्यांचा जन्म नेवासे येथे झाला. त्यांचे वडील न्यायालयात नोकरीला होते. डॉ. गावडे यांचे माध्यमिक शिक्षण ‘भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय’ अहमदनगर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ व ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालय’ पुणे येथे झाले.

डॉ. गावडे स्वभावाने अतिशय शांत आणि निगर्वी होते. आपल्या सावरकर यांच्यावरील प्रबंधामुळे ते महाराष्ट्रात, सावरकरप्रेमी जनतेत विशेष प्रसिद्ध झाले. नूतन मराठी विद्यालयात ते शिकवीत, तसेच पुणे विद्यापीठात मानद प्राध्यापक म्हणूनही ते जात. टिळक स्मारक मंदिराशी त्यांचे निकटचे नाते होते. जयंतराव टिळक यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. हिंदू महासभेचे मामाराव तथा शं. रा. दाते यांच्याशीही त्यांचे निकटचे संबंध होते. विशेष म्हणजे हिंदू महासभेत ते प्रत्यक्षात नव्हते, तरीही हिंदू महासभेच्या तत्त्वज्ञानाची शहानिशा करून त्यांनी त्या तत्त्वज्ञानाची आब राखली होती, अशी आठवण त्यांचे विद्यार्थी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त वैद्य चिंतामण साठे यांनी सांगितली. विद्यार्थ्यांना मराठी भाषेसंबंधात ते नेहमी मोलाचे मार्गदर्शनही करीत. भाषाविषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करीत. सावरकर यांच्या कमला काव्यावर त्यांनी विशेष अभ्यास केला होता.

एक अतिशय प्रतिभावान व्यक्ती म्हणून डॉ. गावडे यांच्याकडे पाहिले जाते. ‘सावरकर एक चिकित्सक अभ्यास’ हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता आणि तो नंतर पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ अतिशय अभ्यासपूर्ण आणि विवेचनात्मक पद्धतीने लिहिलेला असून सावरकर यांच्या अभ्यासकांसाठी तो मोलाचा ग्रंथ मानला जातो. यशिवाय त्यांनी अन्य पुस्तकेही लिहिली आहेत. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांमध्ये एकाचवेळी एम. ए. केलेले डॉ. गावडे शिक्षणक्षेत्रात अतिशय महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. मुक्तांगण ते मुक्त विद्यापीठ, विचार प्राथमिक शिक्षणाचा ही शिक्षणविषयक त्यांची पुस्तके अतिशय मार्गदर्शक आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये १९९४ साली सावरकर यांच्यावरील परिसंवादात त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर प्रबंध लिहिलेल्या भारतातील विद्वानांचा, प्राध्यापकांचाही सन्मान करण्यात आला होता. यामध्ये पुण्यातील डॉ. शं. ना. नवलगुंदकर, डॉ. प्र. ल. गावडे, औरंगाबादचे डॉ. त्रि. चि. फडतरे, नागपूर विद्यापीठातील डॉ. हरिंद्र श्रीवास्तव आणि डॉ. सुधाकर भालेराव तर राजस्थानातून डॉ. रामसिंहजी सोलंकी यांचा समावेश आहे.

डॉ. आशाराणी गुप्ता आणि ज्योती त्रेहान यांनी अनुक्रमे दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथील विद्यापीठातून एम फिल केले होते. यावेळी हे दोघे तसेच आग्रा येथील गिरिजाशंकर शर्मा काही कारणांमुळे त्या समारंभाला त्यावेळी उपस्थित राहू शकले नव्हते. या समारंभात अन्य उपस्थित विद्वानांचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने २६ फेब्रुवारी १९९४ या दिवशी प्रकट सत्कार करण्यात आला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने डॉ. प्र. ल. गावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी वाहिली आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content