Homeकल्चर +भोपाळमध्ये पाहा गोंड-भिलसारख्या...

भोपाळमध्ये पाहा गोंड-भिलसारख्या आदिवासींचे जीवन

मध्य प्रदेशातल्या भोपाळला त्या राज्यातील पहिले सिटी म्युझियम मिळणार आहे. ऐतिहासिक मोतीमहालाच्या एका विंगमध्ये सिटी म्युझियम उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मध्य प्रदेशच्या पर्यटन व संस्कृती विभागाचे प्रधान सचिव तथा एम. पी. पर्यटन मंडळचे व्यवस्थापकीय संचालक शिवशेखर शुक्ला म्हणाले की, या बहुप्रतीक्षित संग्रहालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिसरातील इतिहास आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा पर्यटकांना अनुभवता येईल. त्याचबरोबर पर्यटकांना येथे मध्य प्रदेशातल्या गोंड, भिल अशा सात प्रमुख आदिवासी जमातींच्या जीवनाची अनुभूती मिळेल.

भोपाळ आणि आसपासच्या परिसरातील पुरातत्त्वीय शोध, प्रागैतिहासिक शिलाचित्रे, दगडी अवजारे, प्राचीन शिल्पे, मंदिराचे अवशेष आणि भोपाळ नवाब काळातील उत्कृष्ट कलेचे संग्रह पर्यटकांना अवगत होतील. दृकश्राव्य मार्गदर्शक, क्यूआर कोड स्कॅनर अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्व वयोगटासाठी आकर्षक आणि माहितीपूर्ण अनुभव निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. भोपाळच्या पहिल्या महिला शासक कुदसिया बेगम (१८१९-३७) यांची कन्या सिकंदर बेगम (१८४४-६८) हिने मोतीमहाल बांधला.

भोपाळचे प्रतापी शासक राजा भोज यांचे जीवन, महानता, शौर्य, शिक्षण आणि लोककल्याण क्षेत्रात केलेल्या विकासकामांची लोकांना माहिती व्हावी यासाठी आणखी एक संग्रहालय तयार करण्यात येणार असल्याची माहिती शुक्ला यांनी दिली. मोतीमहलच्या दुसऱ्या विंगमध्ये मध्य भारतातील महान योद्धा आणि परमार शासक राजा भोज यांच्या जीवनावर आधारित संग्रहालयाला महाप्रताप भोज संग्रहालय असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. राजा भोजशी संबंधित वस्तू येथे प्रदर्शित केल्या जातील.

आदिवासी संग्रहालयात आदिवासींची सात घरे

आदिवासी समाजाची जीवनशैली समजून घेण्यासाठी आणि ती जवळून पाहण्यासाठी भोपाळ येथील मध्य प्रदेश आदिवासी संग्रहालयात गोंड, भिल, बैगा, कोरकू, भारिया, सहारिया आणि कोल या मध्य प्रदेशातील सात प्रमुख जमातींची सात घरे बांधण्यात आली आहेत. या घरांमध्ये तीन ते सहा महिने या जमातींची कुटुंबे राहणार आहेत. पुढे रोटेशन तत्त्वावर इतर कुटुंबे या घरांमध्ये राहायला येत राहतील.

या उपक्रमामुळे शहरी समाज आणि युवकांना राज्यातील आदिवासी समाज जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या खऱ्या वस्त्यांमध्ये राहणारा खरा मध्य प्रदेश पाहता येणार आहे. या निवासस्थानांमुळे आदिवासी समाजातील खाद्यपदार्थ आणि कला पाहण्याची संधीही त्यांना मिळणार आहे.

आदिवासी समाजाने आपल्या वेगळ्या जीवनशैलीनुसार या घरांची वास्तू बांधून विकसित केली आहे. ही घरे बांधण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. बांबूच्या पोत्यावर मातीचा लेप करून बनवलेली भिंत…, घराबाहेर मोठ्या देवाची प्रतिष्ठापना… आणि घरातील चिखल आणि दगडी ग्राइंडर. मध्य प्रदेशातील जमातींची ही शैली, त्यांची संस्कृती, राहणीमान, पेहराव, खाणे-पिणे लवकरच एमपी आदिवासी संग्रहालयात पाहायला मिळणार आहे. या घरांमध्ये अन्नसाठवणूक कोठी, खाट, दैनंदिन वापराचे साहित्य आणि स्वयंपाकघर विशेष पाहायला मिळणार आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content