Homeन्यूज अँड व्ह्यूजएकदा सांगून तुमच्या...

एकदा सांगून तुमच्या डोसक्यातच शिरत नाही…

आम्ही काहीही केले किंवा महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे असं म्हटलं की तुम्ही नाही.. नाही.. नाही.. असं म्हणता. तुमच्या डिक्शनरीतून नाही.. नाही.. नाही.. हा शब्द काढून टाका आणि तिथं होय.. होय.. होय.. असा शब्द घाला, असा सल्ला अजित पवारांनी विरोधकांना दिला तेव्हा विरोधकांसह सर्वांनीच त्यांना दाद दिली. त्यांचे भाषण लांबले तेव्हा जयंत पाटील बसल्या जागेवरूनच म्हणाले की, हे तुम्ही अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते. आता उशीर होतोय.. त्यावर पवार उत्तरले की, जयंतराव दोन तास नाही, एक तासच झालाय. कारण बाराला नाही तर साडेबाराला भाषण सुरू केलेय. दुसरे म्हणजे आम्ही पुन्हा पुन्हा सांगणार.. कारण एकदा सांगून तुमच्या डोसक्यात गोष्टी शिरतच नाहीत, तर काय करू? आणि दुसरं म्हणजे तुम्ही फेक नॅरेटिव्ह सांगून लोकसभेच्या ३१ जागा जिंकल्यात आणि आम्हाला धसकाच बसलाय. त्यामुळे आता तुम्हाला निवडणुकीपर्यंत हे पुन्हा पुन्हा रोजच ऐकावं लागणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच विधानसभेत आज एकच हंशा उसळला.

डोसक्यात

अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांच्या सर्व आरोपांना जशास तसे, अशा शब्दांत उत्तर दिले. तुमचे सगळे चुनावी जुमले होते आणि फेक नॅरेटिव्ह होते, असे सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे अजित पवारचा वादा आहे, अशा शब्दांत त्यांनी विधानसभेतील सर्वांचीच दाद मिळवली.

दीड तासाच्या भाषणात जयंत पाटील यांनी उद्धृत केलेल्या विंदा करंदीकर यांच्या कवितेला विंदांच्याच कवितेने प्रत्युत्तर देत त्यांनी शेरोशायरीही सादर केली. विंदाच्या कवितांपैकी एवढे लक्षात ठेवा, अशी विविध गोष्टींची शाश्वत सत्यांची जाणीव विरोधकांना करून देत, ज्यांना आम्ही बोलायला-चालायला शिकवलं, तेच लोक आमच्यावर चाल करून येत आहेत, अशा अर्थाचा शेरही जयंत पाटलांना त्यांनी ऐकवला.

डोसक्यात

जागेवर बसून जंयत पाटील यांनी शेरेबाजी केली तेव्हा अजित पवार म्हणाले की, आता मला जबाबदारीनं वागावं लागतं. पूर्वी कुणाच्या तरी हाताखाली काम केले की मग सगळं वरच्यांवर ढकलता येतं. तसं आता नाही.. त्यांच्या या टिप्पणीवरही सभागृहात हंशा उसळला. संत तुकारामांचे अभंग, शेरोशायरी आणि विंदांच्या कविता सादर करताना पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांच्याबद्दल अजित पवार यांनी गौरवोद्गारही काढले. जे केलं आहे, ते केलं असं म्हणायलाच हवं, अशी पुस्ती त्यांनी जोडली तेव्हा सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

Continue reading

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....

वाटाणा वाटाणा पे लिखा है `खाने’वाले का…

वाटाण्यावाटाण्यात काय फरक असणार, असे कोणी विचारले तर हा प्रश्न निरर्थक मानू नका. हिरव्या आणि पांढऱ्या वाटाण्यात फरक असतो आणि या फरकातून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही सरकारवर होऊ शकतो, हे मंगळवारी राज्याच्या विधानसभेत दिसून आले. आमदार कैलास घाडगे-पाटील...
Skip to content