Homeचिट चॅटसविता दामले यांना...

सविता दामले यांना महिला गौरव पुरस्कार!

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व महाराष्ट्र महिला व्यासपीठ यांच्या वतीने महिला गौरव पुरस्काराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. पुरस्काराचे यंदाचे दुसरे वर्ष होते. हा पुरस्कार ज्येष्ठ अनुवादक सविता दामले यांना शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी खेर, चित्रपट निर्मात्या कांचन अधिकारी, महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या रेखा नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात शारदास्तवन आणि दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर संयोजिका रेखा नार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. गौरव पुरस्काराच्या सन्मानपत्राचे वाचन जयश्री आपटे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन अधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच सामाजिक विषयावर कविता भडके यांनी आहारशास्त्र आणि जनजागृती तर पूजा कारेकर यांनी हरविलेले बालपण आणि वैशाली चेके-पाटील यांनी सामाजिक कार्य व समस्या विषयावर आपले विचार व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिका संजीवनी खेर यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content