Homeबॅक पेजपहिल्याच तिमाहीत उत्पादन...

पहिल्याच तिमाहीत उत्पादन व विक्रीत SAIL सर्वोत्तम!

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने आर्थिक वर्ष 2023-24 (Q1 FY24) यात पहिल्या तिमाहीत उत्पादन आणि विक्री दोन्ही याबाबतीत विक्रमी कामगिरी केली आहे.

पहिल्या तिमाहीत गरम धातू, कच्चे पोलाद आणि विक्री योग्य स्टीलचे उत्पादन, अनुक्रमे 5.037 दशलक्ष टन 4.667 दशलक्ष टन, आणि 4.405 दशलक्ष टन एवढे झाले असून, या तिमाहीतील सर्वोत्तम कामगिरी म्हणून नोंदवण्यात आले आहे. ही संख्या मागील सर्वोत्तम कामगिरीच्या तुलनेत अनुक्रमे 7%, 8% आणि 8% इतक्या उल्लेखनीय रीतीने वाढल्याचे दिसून आले आहे.

गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत (CPLY)सुमारे 24% वाढ दर्शवत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने (SAIL) पहिल्या तिमाहीत 3.9 दशलक्ष टन इतकी विक्री करून आपली आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे. जास्तीत जास्त क्षमतेचा वापर आणि ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यावर सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे ही विक्रमी कामगिरी करणे साध्य झाल्याचे सिद्ध झाले आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content