Homeटॉप स्टोरीकृष्‍णात खोत यांच्या...

कृष्‍णात खोत यांच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमी पुरस्कार!

साहित्य अकादमीने 24 भाषांमधील वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली आहे. 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कवितासंग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1 साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत. मराठी भाषेतील कादंबरीसाठी कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला तर कोंकणी भाषेतील लघुकथेसाठी प्रकाश एस. पर्येकर यांच्या ‘वर्सल’ या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे.

24 भारतीय भाषांमधील प्रतिष्ठित परीक्षक सदस्यांनी शिफारस केलेल्या पुरस्कारांना साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाने 20 डिसेंबर 2023 रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. पुस्तकांची निवड संबंधित भाषांमधील तीन सदस्यांच्या परीक्षकांनी केलेल्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली होती. कार्यपद्धतीनुसार, कार्यकारी मंडळाने परीक्षकांनी एकमताने केलेली निवड किंवा बहुमताच्या आधारावर केलेल्या निवडीच्या आधारे पुरस्कार घोषित केले. पुरस्काराच्या आधीच्या पाच वर्षांत (म्हणजे 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान) प्रथम प्रकाशित झालेल्या पुस्तकांशी संबंधित हे पुरस्कार आहेत.

प्रत्येकी 1,00,000/- रुपये रोख,  ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून 12 मार्च 2024 रोजी कमानी सभागृह, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली- 110 001 येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.

अकादमी

मराठीचं “रिंगाण” समृद्ध करणारी कामगिरी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्र्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केली आहे. त्यांच्या या शैलीवर आणि प्रतिभेवर साहित्य अकादमी पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी ‘रिंगाण’ मधून मराठी साहित्याचे रिंगण समृद्ध करणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कादंबरीकार कृष्णात खोत यांचे साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

‘आधुनिक जगरहाटीत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावा-गावातील बदलत्या जीवनाचं नेमकं चित्रण करण्यात खोत यांचा हातखंडा आहे. तो त्यांनी आपल्या लेखनातून अनेकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या साहित्यकृतीचा सन्मान होण्याने मराठी साहित्य क्षेत्रातील नवोदितांसाठी  प्रेरणा मिळणार आहे.लेखक, कादंबरीकर कृष्णात खोत यांच्या हातून यापुढेही अशीच दर्जेदार साहित्य सेवा घडत राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 

Continue reading

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...
Skip to content