Homeब्लॅक अँड व्हाईटसचिन तेंडुलकरने लाँच...

सचिन तेंडुलकरने लाँच केले लिव्‍हप्‍युअरचे नवे वॉटर प्‍युरिफायर

लिव्‍हप्‍युअर, या भारतातील आघाडीच्‍या होम व लिव्हिंग कंझ्युमर प्रॉडक्‍ट उत्‍पादक कंपनीने नवीन टेलिव्हिजन जाहिरात लाँच केली आहे. या जाहिरातीमध्‍ये ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर सचिन तेंडुलकर आहे. या जाहिरातीच्‍या माध्‍यमातून कंपनीचा उल्‍लेखनीय व नाविन्‍यपूर्ण प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायर सचिनने लाँच केला आहे.

या टीव्‍हीसीमधून लिव्‍हप्‍युअरची स्‍वच्‍छ व शुद्ध पिण्‍याचे पाणी वितरित करण्‍याप्रती समर्पितता दिसून येते. तसेच ही टीव्‍हीसी प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायरमध्‍ये असलेल्‍या त्‍यांच्‍या प्रगत आरओ तंत्रज्ञानाच्‍या व्‍यापक पर्यावरणीय फायद्यांवर प्रकाश टाकते. या तंत्रज्ञानामध्‍ये दरवर्षाला जवळपास २०,००० लीटर पाण्‍याचे संवर्धन करण्‍याची क्षमता आहे.

कोणत्‍याही स्रोतामधील पाण्‍याला शुद्ध करणाऱ्या ८-स्‍टेज फिल्‍ट्रेशन सिस्‍टमसह तुमच्‍या घरामध्‍ये प्रत्‍येकवेळी उच्‍च दर्जाचे शुद्ध व पिण्‍यायोग्‍य पाणी उपलब्‍ध असण्‍याची खात्री मिळते. हे इनोव्‍हेशन ग्‍लासेस्, बॉटल्‍ससाठी सानुकूल डिस्‍पेन्सिंग पर्याय देते. तसेच अधिक सुरक्षिततेसाठी व्‍यापक ८.५-लीटर स्‍टोरेज क्षमता व इन्‍सेक्‍ट-प्रूफ वॉटर टँक आहे.

लिव्‍हप्‍युअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक राकेश कौल म्‍हणाले की, आमच्‍या प्‍लॅटिनो कॉपर वॉटर प्‍युरिफायरमधील नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून आमची कटिबद्धता दिसून येते. हे फक्‍त उत्‍पादन नसून पृथ्‍वीवरील सर्वात बहुमूल्‍य संसाधन असलेल्‍या पाण्‍याचे संरक्षण करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेचे प्रतीकदेखील आहे. आमच्‍या नवीन टेलिव्हिजन जाहिरातीमधून लिव्‍हप्‍युअरची तत्त्वे नाविन्‍यता व शाश्‍वतता दिसून येतात. व्‍यक्‍तींचे जीवन सुधारणारी आणि पर्यावरणावरील परिणाम कमी करणारी उत्‍पादने निर्माण करण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेचे हे व्हिज्‍युअल सादरीकरण आहे. आम्‍ही आशा करतो की, आमचा संदेश विशेषत: सणासुदीच्‍या काळादरम्‍यान ग्राहकांशी संलग्‍न होईल आणि त्‍यांना या महत्त्वपूर्ण मिशनमध्‍ये आमच्‍यासोबत सामील होण्‍यास प्रेरित करेल. सहयोगाने, आपण आपल्‍या भूमातेसाठी सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणू शकतो, ज्‍यामधून भावी पिढ्यांसाठी शुद्ध व सुरक्षित पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध असण्‍याची खात्री मिळेल.

सणासुदीचा काळ जवळ आला असताना लिव्‍हप्‍युअरला ग्राहकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळण्‍याची आणि विक्रीमध्‍ये लक्षणीय वाढ होण्‍याची अपेक्षा आहे. टीव्‍हीसीचा लक्षवेधक संदेश उत्‍सवी उत्‍साहाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे, ज्‍यामुळे आपल्‍या स्‍वत:च्‍या जीवनासह प्रियजनांचे जीवन सुरक्षित करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी वॉटर प्‍युरिफायर्स योग्‍य व अर्थपूर्ण निवड आहेत.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content