Thursday, September 19, 2024
Homeमाय व्हॉईसशरद पवारांचे राजीनामानाट्य...

शरद पवारांचे राजीनामानाट्य म्हणजे शुद्ध बनवाबनवी!

लबाड संधीसाधू ढोंगी नेत्यांना कायम मांजरीच्या डोळे मिटून दूध पिण्याच्या भूमिकेचे समर्थन करायला आवडते. पण ज्यांच्या हाती मतदानरुपी काठी आहे, असते ते या राज्यातले समस्त मतदार अतिशय चाणाक्ष, चतुर आणि हुशार असतात. दुर्दैवाने हे नेत्यांच्या लक्षात येत नाही. मग त्या-त्या वेळी या मतदारांची मतदानरुपी काठी अशा नेत्यांच्या पार्श्वभागावर बसली की मग त्यांची नाठाळ वृत्ती भानावर येते. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शरद पवारांनी जेव्हा, ज्याक्षणी राजकीय निवृत्तीची घोषणा केली त्यावेळी तरी त्यांनी निदान सभोवताली, अवतीभोवती चार चांगली माणसे, नेते उभे करायचे होते. पण आयुष्यभर सत्तेच्या मस्तीत वावरणाऱ्या पवारांच्या ते लक्षातच आले नसावे.

चार वाईट माणसे, नेते, अधिकारी सभोवताली ठेवणे हा मला वाटते पवार यांना अंगावरच्या अनमोल, अमोल किंमती दागिन्यांसारखा वाटतो. एखाद्या नामचीन दादा, गुंडाच्या सभोवताली जसे केव्हाही बघा, आठ-दहा टगे, गुंड, आडदांड उभे असतात तसेच कायम पवारांचे… क्वचित त्यांनी आर. आर. आबांसारखे जंटलमन सभोवताली, अवतीभोवती उभे केले असतील. पण जेव्हाकेव्हा शरद पवारांना बघावे, सभोवताली त्यांच्या चांगल्या नेत्यांचा गराडा कधी आढळलाच नाही. कधी छगन भुजबळ तर कधी माजीद मेमन. कधी हसन मुश्रीफ तर कधी नवाब मलिक. भ्रष्ट आणि ओवाळून टाकलेले नेते… त्यादिवशी म्हणजे जेव्हा ते राजकीय संन्यासाच्या दिशेने जात होते तेव्हादेखील म्हणजे राजकारणाच्या अखेरच्या क्षणीदेखील त्यांना बिलगून होते अतिभ्रष्ट, तुरुंगात जाऊन आलेले, वादग्रस्त अनिल देशमुख. पवारांना या अशा नेत्यांचा कायम अभिमान वाटत आलेला आहे. पण वर जे म्हणालो तसेच… नेमके तेच सत्य. चाणाक्ष मतदारांचे या अशा दृश्यांवर, वृत्तीवर बारीक लक्ष असते. सूक्ष्म निरीक्षण असते. पवारांच्या बाजूला अनिल देशमुख छाप नेते बघून किळस आली…

शरद

ज्या नेत्यांकडे बघून घृणा वाटावी, किळस यावी, अशा नेत्यांना मोठे करणे यापुढे शरद पवार किंवा अन्य राजकीय पक्षांनीदेखील थांबवावे. अन्यथा प्रत्येक बड्या नेत्याची आणि त्यांच्या राजकीय पक्षाची अवस्था नंतरच्या काही वर्षांत हुबेहूब शरद पवार यांच्याचसारखी होईल, हे अंतिम सत्य आहे. त्यात बदल नाही. भाकरी फिरवण्याचा पवार यांनी घेतलेला निर्णय म्हणाल तर अचूक, म्हणाल तर कौतुकास्पद. पण भाकरी फिरवताना जर याच शरद पवार यांनी मागल्या चुका पुन्हा पुढे केल्या, म्हणजे त्याच अनिल देशमुख, नवाब मलिक वृत्तीच्या नवनेत्यांना, पिढ्यांना चुकून संधी दिली तर भविष्यात पवारांचे किंवा त्यांच्या राजकीय वारसदारांचे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे आहे त्यापेक्षादेखील अधिक अतोनात हाल होतील यात शंका नाही. म्हणजे आदिती तटकरे यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी, मेहनती, सुस्वभावी तरुण-तरुणींना पवारांनी नक्की पुढे नेण्यास हरकत नाही. पण दहा पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती बापाने वाममार्गाने मिळविल्यानंतरदेखील जर आदिती मंत्री झाल्यानंतर सुनील तटकरे तिच्या कार्यालयात सतत ठाण मांडून बसणार असतील तर पवारांनी केवळ चेहरे बदलले वृत्ती तीच ठेवली, असे म्हणून मतदार पवारांचा अधिक राग करून मोकळे होतील,  नक्की… उत्तम संस्कारांचे तरुण संस्कारी, जातीयवादी नसलेले भ्रष्टाचारापासून दूर राहणारे नेते ही केवळ शरद पवार यांचीच नव्हे तर राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षाची गरज आहे. यापुढे थोड्याच दिवसांत पवार ज्यांच्या हाती पक्षाची उद्याच्या राजकारणाची राज्याची धुरा सोपविणार आहेत त्यातली बहुतांश यादी जी माझ्या हाती आली आहे ती वाचून पवारांनी फक्त चेहरे बदलले, वृत्ती तीच घाणेरडी, असे म्हणण्याची नक्की पुन्हा आपल्यावर वेळ येणार आहे…

Continue reading

पवार पॉवर पर्व संपल्यात जमा…

आजपर्यंत, आजतागायत मी याआधी कधीही ना लिहिले, ना म्हटले की पवार संपले. पण आता पुन्हा नव्याने पक्ष बांधू असे जाहीर सांगणारे पवार संपूर्ण, पूर्णतः संपल्यात जमा आहेत. पण ते कसे यापुढे राजकीयदृष्ट्या जिवंत राहतील, त्यांचे अस्तित्त्व कसे आणखी टिकून...

विधान परिषदेचे सभापती कोण? रामराजे की नीलमताई??

विधानसभा भाजपाच्या ताब्यात आहे. तेथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई ऍडव्होकेट राहुल नार्वेकर अलीकडे अध्यक्ष झाले आहेत. विधान परिषदेचे सभापतीपद खाली आहे. विधान परिषदेच्या सभापतीचा कार्यभार उपसभापती उद्धव सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे असला तरी...

मान गये उद्धव उस्ताद!!

मराठा आरक्षण आंदोलनाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कंटाळले होते. कारण, या आंदोलनाने त्यांना फार छळले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या मराठा आरक्षण आंदोलनाचा, मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या समस्त नेत्यांनी केवळ बुजगावण्याची भूमिका घेतली आणि आंदोलन बऱ्यापैकी थंडावले....
error: Content is protected !!
Skip to content