Homeचिट चॅट‘क्विक हील’च्या सल्लागार...

‘क्विक हील’च्या सल्लागार मंडळावर रिचर्ड स्टिनॉन!

ग्राहक, व्यवसाय आणि सरकार यांना सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षण समाधान पुरवण्याच्या अग्रगण्य प्रदात्यांपैकी एक, क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या सल्लागार मंडळावर जागतिक उद्योगातील अनुभवी रिचर्ड स्टिनॉन यांची नियुक्ती केली.

ही नियुक्ती अशावेळी झाली आहे जेव्हा क्विक हील झिरो ट्रस्ट, डेटा प्रायव्हसी आणि एंडपॉईंट डिटेक्शन अँड रिस्पॉन्ससारख्या पुढच्या पिढीच्या उपायांमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने आपल्या संशोधन आणि विकास प्रयत्नांना गती देत आहे.

क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे एमडी आणि सीईओ डॉ. कैलाश काटकर म्हणाले की, रिचर्ड स्टिनॉन आमच्या मंडळात सामील झाल्याचा आम्हाला आनंद होत आहे. त्यांचे कौशल्य आणि सायबर सुरक्षेतील विस्तृत अनुभव क्विक हीलला एंटरप्राइझ सुरक्षा क्षेत्रात वाढ करण्यास आणि नाविन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणण्यास मदत करेल. त्यांचे मार्गदर्शन जागतिक बाजारपेठेतील क्विक हीलच्या प्रवासातही उपयुक्त ठरेल. आमच्यासाठी ही एक रोमांचक वेळ आहे. आम्ही ब्रँड ‘सेक्यूराइट’ एंटरप्राइझ सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व वाढवत आहोत. रिचर्ड यांचे मंडळातील योगदान आणि क्विक हीलच्या सातत्यपूर्ण यशाची आम्ही वाट पाहत आहोत.

२५ वर्षांहून अधिक समृद्ध अनुभव असलेले रिचर्ड हे जागतिक सायबर सुरक्षा उद्योगातील सर्वात प्रसिद्ध विश्लेषक आणि या वर्गातील प्रमुख आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी सिमॅन्टेक, मॅकफी, सिस्को, मायक्रोसॉफ्ट आणि ट्रेंड मायक्रोसह काही मोठ्या सायबर सुरक्षा कंपन्यांमधील कार्यकारी संघ आणि मंडळांना सल्ला दिला होता. आपल्या यापूर्वीच्या कारकिर्दीत त्यांनी गार्टनर, पीडब्ल्यूसी, वेबरूट सॉफ्टवेअर, फोर्टिनेट आणि ब्लँको टेक्नॉलॉजी ग्रुप येथे वरिष्ठ नेतृत्त्वाची पदे भूषविली आहेत.

ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ बँकेसाठी ते एक्सट्रीम सायबर अॅडव्हायझरी पॅनेलचे सल्लागार होते. शिवाय, सिंगटेलने ट्रस्टवेव्हच्या अधिग्रहणासह अनेक एम अँड ए सौद्यांसाठी योग्य परिश्रम केले होते. सध्या रिचर्ड हे आयटी-हार्वेस्ट या कंपनीचे मुख्य संशोधन विश्लेषक आहेत, ज्याची त्यांनी २००५मध्ये स्थापना केली होती आणि ते अनेक स्टार्टअप्सच्या सल्लागार मंडळावर आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content