Friday, November 22, 2024
Homeडेली पल्सपंतप्रधान मोदींच्या हस्ते...

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 109 अप्रतीम वाणांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता, नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या जैवसंवर्धनयुक्त, अशा 109 अप्रतीम वाणांचे लोकार्पण करतील. यावेळी पंतप्रधान शेतकरी आणि शास्त्रज्ञांशीही संवाद साधतील.

पंतप्रधान मोदी 61 पिकांच्या 109 जातींचे लोकार्पण करतील, ज्यामध्ये 34 शेतीची पिके आणि 27 बागायती पिकांचा समावेश असेल. शेतीच्या पिकांमध्ये भरडधान्ये, गवत वर्गातील पिके, तेलबिया, कडधान्ये, ऊस, कापूस, तंतुमय पिके, चांगले उत्पादन देणाऱ्या इतर पिकांसह विविध तृणधान्यांच्या बियाण्याचे पंतप्रधान यावेळी लोकार्पण करतील. बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळे, भाज्या, लागवडीची पिके, कंद वर्गातील पिके, मसाले, फुले आणि औषधी वनस्पतींचे लोकार्पण केले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शाश्वत शेती आणि हवामानाशी जुळवून घेणाऱ्या पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन दिले आहे. भारताला कुपोषणमुक्त करण्यासाठी, पंतप्रधानांनी पिकांच्या जैवसंवर्धनयुक्त प्रजातींना सरकारच्या माध्यान्ह भोजन, अंगणवाडी यांसारख्या अनेक कार्यक्रमांशी जोडून या पिकांच्या लागवडीला चालना व प्रोत्साहन देण्यावर भर दिला आहे. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल आणि त्यांच्यासाठी उद्योजकतेचे नवीन मार्ग खुले होतील, हा यामागचा हेतू आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या 109 वाणांचे लोकार्पण म्हणजे, त्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content