Homeबॅक पेजथिमॅटिक हबसाठी विज्ञान...

थिमॅटिक हबसाठी विज्ञान मंत्रालयाने मागवले पूर्व-प्रस्ताव!

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या 9व्या आवृत्तीच्या पार्श्‍वभूमीवर 20 जानेवारी 2024 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (DST) सचिव प्राध्यापक अभय करंदीकर यांनी सुरू केलेल्या थिमॅटिक हब्स (T-Hubs) अर्थात संकल्पनाधारित केंद्राच्या स्थापनेसाठी पूर्व-प्रस्तावांच्या आवाहनामुळे राष्ट्रीय क्वांटम मोहिमेच्या (NQM) प्रवासाने मैलाचा दगड गाठला आहे.

क्वांटम कॉम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेन्सिंग आणि मेट्रोलॉजी आणि क्वांटम मटेरिअल्स आणि डिव्हाइसमध्ये संकल्पनाधारित केंद्र स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय क्वांटम मोहिमेच्या (NQM) उद्दिष्टांशी साधर्म्य साधत तसेच एकसंघपणे शैक्षणिक संस्था/संशोधन आणि विकास प्रयोगशाळा यांच्याकडून नाविन्यपूर्ण पूर्व-प्रस्तावांच्या माध्यमातून सादर करण्याचे आवाहन केले आहे.

पूर्व-प्रस्ताव सादर करणे हे गेल्या वर्षी मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या राष्ट्रीय क्वांटम मोहिमेमधील एक महत्त्वाचे पाऊल आहे. लवकरच नियोजित कौशल्य, सामर्थ्य आणि संधी ओळखण्यासाठी संशोधकांसोबत विचारमंथन सत्रासह, राष्ट्रीय क्वांटम मोहिमेत पुढील काही महिन्यांत भरीव प्रगती होण्याची अपेक्षा आहे. संशोधनासाठी नियुक्तीयोग्य तंत्रज्ञान अनुवादित करण्यासाठी उद्योग आणि स्टार्टअप्सच्या सहकार्याने देखील NQM कार्य करेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) हे प्रस्ताव सादर करण्यासाठी आणि संशोधकांना सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने आवश्यक संसाधने प्रदान करेल ज्यायोगे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक कामगिरी करू शकेल, असे डीएसटीचे सचिव प्राध्यापक अभय करंदीकर यांनी प्रस्ताव मागवताना सांगितले.

या मोहिमेमधील सहकार्याची भावना राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यास मदत करू शकते हे त्यांनी अधोरेखित केले.

क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर पुढे नेण्यासाठी क्वांटम तंत्रज्ञानाचे प्रदर्शन या पूर्व-प्रस्तावांमधून झाले पाहिजे. सादरीकरणाचे ठळक मुद्दे तसेच इतर तपशील DST विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे वरिष्ठ सल्लागारआणि SERB विज्ञान आणि अभियंता संशोधन मंडळाचे सचिव डॉ. अखिलेश गुप्ता यांनी विशद केले.

राष्ट्रीय क्वांटम मोहिमेच्या (NQM) मोहीम प्रशासक मंडळाच्या (MGB) पहिल्या बैठकीत अलीकडेच NQM अंतर्गत चार तंत्रज्ञान केंद्रे स्थापन करण्याच्या उद्देशाने प्रस्ताव आमंत्रित करण्यासाठी पूर्व-प्रस्ताव मागवण्याच्या निर्णयाला समितीने मान्यता दिली होती. NQM ची केंद्रीय भूमिका लक्षात घेऊन मंजुरीसाठी पाठपुरावा म्हणून प्रस्तावित पूर्व-प्रस्तावांची सुरुवात करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय क्वांटम मोहिमेला (NQM) मंजुरी दिली ज्याची DST च्या माध्यमातून अंमलबजावणी आठ वर्षांच्या कालावधीसाठी एकूण रु. 6003.65 कोटी एवढी आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन आणि विकासाला  खतपाणी घालून त्याचे संगोपन आणि क्वांटम तंत्रज्ञानात (QT) एक चमकदार आणि नाविन्यपूर्ण परिसंस्था निर्माण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. यामुळे QT क्वांटम तंत्रज्ञानाच्या नेतृत्त्वाखालील आर्थिक विकासाला गती मिळेल, देशातील परिसंस्थेचे पोषण होईल आणि क्वांटम तंत्रज्ञान आणि त्याचे उपयोजन (क्यूटीए) विकासात भारत आघाडीच्या राष्ट्रांपैकी एक बनेल.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content