Wednesday, October 30, 2024
Homeकल्चर +मकरंद आणि तेजस्विनीच्या...

मकरंद आणि तेजस्विनीच्या ‘छापा काटा’चे पोस्टर लाँच!

महाराष्ट्राचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी लवकरच नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा नुकताच दणक्यात पोस्टर लाँच झाला असून रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात भन्नाट मनोरंजन अनुभवता येणार आहे.

‘ढ लेकाचा’, ‘कुलस्वामिनी’, ‘बोल हरी बोल’ आणि ‘हिरा फेरी’ या सुपरहिट चित्रपटांनंतर सुशीलकुमार अग्रवाल यांनी ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती केली असून संदीप नवरे यांनी त्याची पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णू, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे प्रसिद्ध अभिनेते प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत. या सर्व अभिनेत्यांची झलक असणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर चित्तवेधक असून प्रेक्षकांना जबदरस्त आकर्षित करत आहे.

Continue reading

आज वसुबारस!

आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया. वसुबारस (गोवत्स द्वादशी)- श्री विष्णूच्या...

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...
Skip to content