Homeचिट चॅटशर्मिला ठाकरेंच्या उपस्थितीत...

शर्मिला ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्याचा ‘शौकीन’ मुंबईत दाखल!

‘कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना..’ हे गाणं ऐकताच डोळ्यासमोर येतो मस्तपैकी तयार केलेला पानाचा विडा. विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहास, परंपरांशी खूप जुनं नातं आहे. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच. यावरून हेच कळतं की, विड्याचं पान हे फक्त भारतातल्या नवाब किंवा राजांचंच नाहीतर सामान्य शौकिनांचंही आवडतं आहे.

तांबुली किंवा नागवेल नामक वेलीचं हे पान इंग्रजीमध्ये बीटल लीफ, हिंदीमध्ये पानचं पान, तेलगूमध्ये तमालपाकु तर मराठीत याला तांबूल असं म्हटलं जातं. जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आतापर्यंत सामान्य शौकीन तरुणाईसुद्धा आजही पान खाणं मस्ट म्हणते.

अशा खास शौकिन मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे अल्पावधीतच राज्यात विशेष लोकप्रिय झालेला ‘शौकीन’ हा पानाच्या विड्याचा ब्रँड आता मुंबईत दादर पश्चिमेच्या रानडे रोडवर उपलब्ध झाला आहे. हे ‘शौकीन’ पान धनंजय केतकर आणि विराज लेले यांनी हा ब्रँड दादर, या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते त्याचे करण्यात आले. याप्रसंगी मनसेच्या रिटा गुप्ता, निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते अजित भुरे, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते संजय मोने, विनय येडेकर, अतुल परचुरे, सखी परचुरे, अजित तेंडुलकर, बीवायपीचे श्रीराम पाध्ये, दिग्दर्शक अजय फणसेकर, धनंजय केतकर, विराज लेले इत्यादी पान शौकीन मान्यवर उपस्थित होते.

पुण्यामधील एका शौकीन अवलियाने २००५ साली पुणेकरांसाठी पाहिलं ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरू केले. शरद मोरे या ध्येयवेड्या माणसाने सर्वोत्कृष्ट अणि अत्यंत दर्जेदार तंबाखूरहित पानांचा स्वाद खऱ्या पानरसिकांच्या परिवारापर्यंत पोहोचविण्याचा विडा उचलून हे ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरू केले. हजारो वर्षांची शाही परंपरा असलेल्या भारतीय पान संस्कृतीचा वारसा आणि स्वाद आपल्यासारख्या पान रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे ध्येय उराशी बाळगत त्यांनी आपला ‘शौकीन’ हा ब्रँड तयार करीत महाराष्ट्रातील पुणे, पंढरपूर, शिर्डी, खारघर असा विस्तार केल्यानंतर आता ते मुंबईत शिरकाव करीत आहेत. दादरमधील प्रसिद्ध सोन्याचांदीचे व्यापारी धनंजय केतकर आणि विराज लेले या ध्येयवेड्या पान शौकिनांना मुंबईकरांसाठी हा विडा उचलण्यास भाग पाडले आहे.

भारतीय संस्कृतीतील पारंपरिक पान सेवनाला आजच्या काळाशी सुसंगत करून घेतलं जातंय. पान खाणं ही जणू पुरुषांचीच मक्तेदारी असल्याचं पूर्वी जाणवायचं. घरातील महिलांना, मुलींना पान खाण्याची इच्छा झाली तरी ते आणण्यासाठी टपरीवर त्यांना जाता यायचं नाही. त्यासाठी वडील किंवा भाऊच सामान्यपणे जात असत. ‘शौकीन’ने हे स्वरूप बदललं असून आमच्या सर्व पान शॉप्समध्ये महिला आणि मुली निर्धास्तपणे येत आहेत. एवढंच नव्हे, तर लहान मुले आणि आजी-आजोबाही पानाचा आस्वाद घेण्यासाठी ‘शौकीन’मध्ये वळू लागल्याचे शरद मोरे यांनी याप्रसंगी सांगितलं. मुंबईत आमची शाखा नव्हती. केतकर बंधूंच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे ‘शौकीन’ यशाचे नवे शिखर गाठणार आहे, असे मोरे सांगतात.

‘शौकीन’ स्पेशलमध्ये चॉकलेट मघई मसाला, व्हॅनिला चॉकलेट, पिस्ता चॉकलेट, स्ट्रॉबेरी चॉकलेट, मँगो चॉकलेट, केशर पिस्ता चॉकलेट, रोस्टेड अल्मन्ड चॉकलेट, ब्लॅक करंट चॉकलेट, साधा पानमध्ये कलकत्ता साधा, कलकत्ता स्पेशल साधा, रामप्यारी (कलकत्ता), मघई साधा, मघई स्पेशल साधा, शौकीन स्पेशल ड्रायफ्रूट मसाला मावा, शौकीन स्पेशल मसाला (स्पेशल मसाला + ड्रायफ्रूट + ५ प्रकारची चटणी), मसाला (मीठा)मध्ये कलकत्ता मसाला, मघई मसाला (जोडी), बनारस मसाला, कलकत्ता मसालामध्ये ड्रायफ्रूट, केशर, मघई मसालामध्ये चॉकलेट, ड्रायफ्रूट, केशर तसेच आईस पान, फायर पान, पुणेरी पान अशा विविध प्रकारच्या चवींची लज्जत मुंबईकरांना चाखता येणार आहे.

लहानग्यांसाठी मेन्यू कार्डमध्ये बदल

खास लहान मुलांसाठी त्यांना आवडणाऱ्या टेस्टची पाने विकसित केली आहेत. ‘व्हॅनिला चॉकलेट पान’, ‘स्ट्रॉबेरी चॉकलेट’, ‘ड्रायफूट पान’, ‘चॉकलेट मघई’, ‘ऑरेंज चॉकलेट’ अशी लहानग्यांना आवडणाऱ्या फ्लेवर्सची रेंज आमच्याकडे असणार आहे. इतकंच काय, ‘बर्थ डे सेलिब्रेशन पान’ आणि चक्क ‘फॅमिली पॅक’ही उपलब्ध आहेत. अगदी २० रुपयांपासून तब्बल साडेतीन हजारापर्यंतचं पान पाहायला मिळत आहे. मुलांसाठीची पानं कात आणि सुपारी न वापरता बनवली जातात, असं ‘शौकीन’ दादरचे संचालक धनंजय केतकर, विराज लेले म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content