Homeएनसर्कलसशस्त्र दलातील निवृत्तीवेतनधारकांच्या...

सशस्त्र दलातील निवृत्तीवेतनधारकांच्या पेंशनमध्ये सुधारणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल समान पद, समान निवृत्तीवेतन (OROP) अंतर्गत सशस्त्र दलातील निवृत्तीवेतनधारक/कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करायला मंजुरी दिली.

1 जुलै 2019पासून सुधारित निवृत्तीवेतन लागू होईल. जुन्या निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतन कॅलेंडर वर्ष 2018मध्ये सेवानिवृत्त झालेल्या आणि त्याच श्रेणीतील समान सेवा कालावधी असलेल्या संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या किमान आणि कमाल निवृत्तीवेतनाच्या सरासरीच्या आधारे नव्याने निश्चित केले जाईल.

लाभार्थी 30 जून 2019पर्यंत निवृत्त झालेल्या सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना {1,जुलै  2014 पासून प्री-मॅच्युअर (PMR) निवृत्त झालेले वगळून} या सुधारित निवृत्तीवेतन श्रेणीचा लाभ मिळेल. सशस्त्र दलातील 25.13 लाखांहून अधिक (4.52 लाखांहून अधिक नवीन लाभार्थ्यांसह) निवृत्तीवेतनधारक/कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळेल. सरासरीपेक्षा जास्त निवृत्तीवेतन असलेल्यांना संरक्षण मिळेल. युद्धातील शहीदांच्या वीर पत्नी आणि दिव्यांग निवृत्तीवेतनधारकांसह कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांनादेखील लाभ दिला जाईल.

चार सहामाही हप्त्यांमध्ये थकबाकी दिली जाईल. मात्र, विशेष/उदारीकृत कौटुंबिक निवृत्तीवेतन आणि शौर्य पुरस्कार विजेत्यांसह सर्व कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना एकरकमी थकबाकी दिली जाईल.

खर्च सुधारित निवृत्तिवेतनाच्या अंमलबजावणीसाठी अंदाजे वार्षिक खर्च @ 31% महागाई दिलासा प्रमाणे 8,450 कोटी रुपये आहे. थकबाकीची रक्कम 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीसाठी 19,316 कोटी रुपये आहे. 1 जुलै 2019 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी @ 17% प्रमाणे आहे आणि 01 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीसाठी @ 31% आहे. 1 जुलै 2019 ते 30 जून 2022पासून लागू थकीत रक्कम लागू असलेल्या महागाई दिलासानुसार 23,638 कोटी रुपये आहे. हा खर्च ओआरओपीच्या सध्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे.

अशी असेल ही अंदाजे पेंशन

पद   पेंशन १ जानेवारी १६ रोजी    पेंशन १ जुलै १९ रोजी   पेंशन १ जुलै २१ रोजी थकबाकी

शिपाई  17,699   19,726   20,394   87,000

नाईक  18,427  21,101   21,930   1,14,000

हवालदार  20,066   21,782   22,294  70,000

नायब सुबेदार  24,232  26,800   27,597   1,08,000

सब मेजर  33,526  37,600  38,863   1,75,000

मेजर  61,205  68,550  70,827   3,05,000

लेफ्ट. कर्नल  84,330   95,400   98,832  4,55,000

कर्नल  92,855  1,03,700  1,07,062   4,42,000

ब्रिगेडिअर  96,555  1,08,800  1,12,596  5,05,000

मेजर जनरल  99,621  1,09,100  1,12,039  3,90,000

लेफ्ट. जनरल  1,01,515   1,12,050   1,15,316   4,32,000

पार्श्वभूमीसंरक्षण दलातील कर्मचारी/कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसाठी समान पद, समान निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि 1 जुलै, 2014पासून सुधारित निवृत्तीवेतनासाठी 7 नोव्हेंबर 2015 रोजी धोरणात्मक पत्र जारी केले. सदर पत्रात, भविष्यात, दर 5 वर्षांनी निवृत्तीवेतन पुन्हा नव्याने निश्चित केले जाईल असे नमूद केले होते. आरओपीच्या अंमलबजावणीसाठी मागील आठ वर्षांत दरवर्षी @ 7,123 कोटी रुपयेप्रमाणे 57,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content