Tuesday, March 11, 2025
Homeटॉप स्टोरीमुंबईत ११ हजार...

मुंबईत ११ हजार प्रॉपर्टी सील!

नागरिकांनी ‘मालमत्ता कर’ वेळेत महापालिकेकडे जमा करावा, यासाठी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही दिवसात सुरू केलेला कारवायांचा धडाका सुरुच असून विविध ठिकाणी कठोर ‌कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत चालू आर्थिक वर्षात मुंबईत ११ हजार ६६१ ठिकाणी अटकावणीची (प्रॉपर्टी सील) कारवाई करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त ४७९ ठिकाणी जलजोडणी खंडित करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी वाहन जप्तीसह, कार्यालयातील वस्तूंचीही जप्ती करण्यात आली असून ४२ भूखंडप्रकरणी लिलावविषयक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या लिलावप्रकरणी महापालिकेस २१०कोटी रुपये इतके येणे आहे. यात प्रामुख्याने मे. सुमेर असोसिएटर यांच्याकडे ५३. ४३ कोटी, मे. सुमेर बिल्डर प्रा. लि.कडे २९.७१ कोटी, मे. लोखंडवाला कोठारी याकडे १३.५५ कोटी, वंडरव्हॅल्यू रियलिटी डेव्हलपर लिमिटेडकडे १४. ६५ कोटी थकित आहेत. अशा सर्वांकडून वसुलीची प्रक्रिया त्यांच्या भूखंडाचा लिलाव करून केली जाणार आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये रुपये ५ हजार २०० कोटी मालमत्ता कर जमा करण्याचे महानगरपालिकेचे लक्ष्य असून आजपर्यंत रुपये ३ हजार ८०० कोटींपेक्षा अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मालमत्ता कर वसुली मोहिमेंतर्गत थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी विनंती करण्यात येत असून त्यानंतरच्या टप्प्यात नोटीस देण्यात येत आहे. मात्र, जे मालमत्ताधारक वारंवार विनंती करुन व नोटीस पाठवूनदेखील मालमत्ता कर रकमेचा भरणा करत नाहीत, त्यांच्याबाबत नाईलाजाने जलजोडणी खंडित करणे, चारचाकी वाहने – वातानुकूलन यंत्रणा यासारख्या महागड्या वस्तू जप्त करणे यासारखी कारवाई करत आहे.

अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालमत्ता कराचा भरणा तातडीने करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याद्वारे पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेने केलेल्या काही महत्त्वाच्या कारवाया

१. ‘एच पूर्व’ विभाग कार्यक्षेत्रातील वांद्रे पूर्व परिसरात असणाऱ्या मे. एमआयजी सहकारी गृहरचना संस्था (विकासक मे. डी.‌बी. रिऍलिटी) यांच्यावर ६६ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या अनुषंगाने वारंवार विनंती करुन व नोटीस बजावून देखील मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही. त्यामुळे संबंधित मालमत्ताधारकाचे वाहन‌ जप्त व स्थानबद्ध करण्यात आले आहे.

२. ‘एच पूर्व’ विभाग कार्यक्षेत्रातील वांद्रे पूर्व परिसरातील एका‌ बहुमज़ली इमारतीत मे. महाराष्ट्र थिएटर प्रा. लि. (मे. आर एन ए कॉर्पोरेट) यांचे कार्यालय आहे. सदर मालमत्ताधारकांकडे रुपये २१ कोटींची मालमत्ता कराची थकबाकी होती. याबाबत वारंवार विनंती करुन व नोटीस बजावूनदेखील मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला नाही. या अनुषंगाने सदर मालमत्ताधारकांच्या आठव्या मजल्यावरील कार्यालयातील साहित्य जप्त करण्यासह त्यांच्या अखत्यारीतील तळमजल्यावर अटकावणीची (Sealing) कार्यवाही करण्यात आली आहे.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content