Friday, November 8, 2024
Homeचिट चॅटलोकसंख्या दिनानिमित्त आज...

लोकसंख्या दिनानिमित्त आज ऑनलाईन व्याख्याने!

आज ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जगभरात साजरा केल जात आहे. लोकसंख्येच्या प्रश्नांची निकड आणि महत्त्व यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने, नेहरू विज्ञान केंद्राने कोविड-19मधील सेरो सर्वेक्षणांचे महत्त्व आणि वाढत्या लोकसंख्येमुळे आपली संसाधने आणि पर्यावरणावर कशाप्रकारे ताण आहे, या विषयांवर व्याख्याने आयोजित केली आहे. 11 जुलैला सकाळी आणि दुपारी अशी ही दोन व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

व्याख्यान 1:

व्याख्याते- डॉ. जयंती एस. शास्त्री, प्राध्यापक आणि प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र  विभाग, टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय आणि बी. वाय. एल नायर रुग्णालय, मुंबई.

दिनांक- 11 जुलै, 2021

वेळ- सकाळी 11.00 वाजता

https://www.facebook.com/nehrusciencecentre वर थेट सहभागी व्हा.

व्याख्यानाबद्दल संक्षिप्त माहिती:

भारतात कोविड-19 महामारी सुरू झाल्यापासून आपण सेरो सर्वेक्षण हा शब्द वारंवार ऐकला आहे. हे सेरो सर्वेक्षण काय आहे, ते कसे केले जाते आणि लोकसंख्येमध्ये झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग समजण्यासाठी ते कसे महत्त्वाचे आहे? लसीचे वितरण किंवा कोविड उपचार केंद्रांच्या नियोजनात ते आपल्याला कशी मदत करू शकते? या सर्वेक्षणांवर साथीचे रोग विशेषज्ञ आणि सरकार अवलंबून का आहे? हे सामूहिक प्रतिकारशक्तीशी कसे संबंधित आहे?, हे या व्याख्यानातून स्पष्ट होईल.

व्याख्यान 2:

व्याख्याते- डॉ. सी. एम. लक्ष्मा, प्राध्यापक, लोकसंख्या संशोधन केंद्र, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन संस्था, बेंगळुरू.

दिनांक- 11जुलै, 2021

वेळ- दुपारी 4.30 वाजता

https://www.facebook.com/nehrusciencecentre वर थेट सहभागी व्हा.

व्याख्यानाबद्दल संक्षिप्त माहिती:

वाढती लोकसंख्या आणि चांगली जीवनशैली लोकांच्या वाढत्या संख्येसाठी अन्न, वस्त्र, निवारा, सोईसुविधा आणि करमणुकीचे सुधारित मानकांची मागणी करते. यामुळे आपली संसाधने आणि पर्यावरणावर ताण येतो आणि त्याचा ऱ्हास झाला आहे. उपभोगाच्या सवयीनुसार आणि सामाजिक संस्था आणि संसाधन व्यवस्थापनाच्या विशिष्ट पद्धतीमुळे हे आणखी तीव्र झाले आहे.

1989मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे जागतिक लोकसंख्या दिन सुरू करण्यात आला. तेव्हा जगाची लोकसंख्या पाच अब्जपेक्षा जास्त होती.

Continue reading

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...
Skip to content