वन प्लस आणि ओप्पो त्यांच्या आगामी स्मार्टफोन्समध्ये ॲपल मोबाईल फोनच्या धर्तीवर अलर्ट स्लायडरला बाय-बाय करून त्याजागी कस्टमाइझ करण्यायोग्य ॲक्शन बटन सादर करण्याची शक्यता आहे. वन प्लस या चिनी स्मार्टफोन कंपनीने लाँच केलेली OnePlus 13 ही सगळ्यात अलीकडची अपडेटेड सिरीज होती. आता वन प्लस आपल्या नव्या सिरीजमध्ये कदाचित नवीन सेंट्रल होम बटनाने वर्षानुवर्षे त्याच्या डिव्हाइसेसना सजवणारा आयकॉनिक अलर्ट स्लायडर काढून टाकण्याच्या दिशेने विचार करत आहे. उल्लेखनीय म्हणजे, अलर्ट स्लायडर हे वन प्लस कंपनीच्या अद्वितीय वैशिष्ट्यांपैकी एक मानले जाते. OnePlus 12 आणि 13 सिरीजमध्ये पूरक IR ब्लास्टरही लक्षवेधी होते.
वनप्लस आणि ओप्पो, ज्यांना एकत्रितपणे ओगा ग्रुप म्हटले जाते, ते त्यांच्या आगामी स्मार्टफोन्समधून अलर्ट स्लायडर काढून टाकतील आणि आयफोन 15 आणि आयफोन 16 मालिकेत दिसणाऱ्या अॅपलसारखे कस्टमायझ करण्यायोग्य ॲक्शन बटण वापरतील. “वन प्लस”चा अलर्ट स्लायडर मोबाईल यूझर्सना डाव्या बाजूला असलेल्या मेटॅलिक बटणावर क्लिक करून त्यांचा फोन रिंगिंगवरून सायलेंट आणि व्हायब्रेटवर स्विच करण्याची सुविधा देतो. दुसरीकडे, “ॲपल”च्या ॲक्शन कीचा वापर विविध ॲप्स उघडणे, कॅमेरा सुरू करणे आणि इतर बऱ्याच ॲक्शन प्रोग्राम करण्यासाठी केला जाऊ शकतो. वनप्लसमध्ये ॲक्शन कीमुळे आता युझर्सना वेगवेगळे साउंड प्रोफाइलदेखील बदलण्याची सुविधाही मिळेल का, याबाबत उत्सुकता आहे.
वन प्लस 13 मिनी सिरीजबाबतही उत्सुकता
वन प्लस आपल्या 13 मिनी सिरीजवरही काम करत आहे. या नव्या स्मार्टफोनची स्क्रीन तुलनेने लहान असेल. 13 मिनीमध्ये क्वालकॉमचा अत्याधुनिक स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट असू शकेल, ज्यामध्ये सात कोअर आहेत. हा प्रोसेसर फ्लॅगशिप OnePlus 13मध्ये आढळतो. म्हणजेच नवा मिनी व्हेरिएंट आकाराने लहान स्क्रीन असूनही फ्लॅगशिप-स्तरीय कामगिरी देईल. नवा वन प्लस मिनी स्मार्ट फोन हा सॅमसंग गॅलक्सी एस 25सारख्या इतर कॉम्पॅक्ट प्रीमियम डिव्हाइसेसशी स्पर्धा करेल. डिस्प्लेच्या बाबतीत, OnePlus 13 Miniमध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि स्मूथ 120Hz रिफ्रेश रेटसह 6.31-इंचाचा LTPO OLED पॅनेल असण्याची शक्यता आहे. स्क्रीन अल्ट्रा-स्लिम बेझलसह फ्लॅट डिझाइन स्वीकारेल, ज्यामुळे एक इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव मिळेल. वाढीव सुरक्षिततेसाठी डिव्हाइसमध्ये ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील समाविष्ट असण्याची अपेक्षा आहे.