Homeचिट चॅटआता झोपेचे महत्त्व...

आता झोपेचे महत्त्व पटवून देणार सानिया मिर्झा!

सेंच्युरी मॅट्रेसची ब्रँड ॲम्बेसेडर सानिया मिर्झा आता टेलिव्हिजन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुदृढ आरोग्यासाठी चांगल्या झोपेचे महत्त्व पटवून देणार आहे. सेंच्युरीच्या सर्वोत्कृष्ट श्रेणीच्या मायपॉवरमॅट आणि ऑर्थोपेडिक गाद्यांसह इतर गाद्या चांगल्या झोपेसाठी कशा योग्य आहेत, हे सांगण्यासाठी ती ‘चॉइस ऑफ चॅम्पियन्स’ नावाची एक विपणन मोहीम सुरू करणार आहे.

काळाची गरज आणि ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार, सेंच्युरी ब्रँडने आपल्या गाद्या अद्वितीय अशा सूक्ष्मजीवविरोधी वैशिष्ट्यासह अद्ययावत केल्या आहेत. नको असलेल्या सूक्ष्मजंतूंशी ते लढा देतात आणि संपूर्ण कुटुंबाची सुरक्षितता, आराम सुनिश्चित करतात. या गुणधर्मांना पटवून देण्यासाठी जाहिरात-चित्रपटांमध्ये वावरणारी प्रख्यात टेनिसपटू आणि सेंच्युरीची ब्रँड ॲम्बेसेडर सानिया मिर्झा दिसणार आहे.

सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीचे नेतृत्त्व करण्यासाठी अधिक चांगल्या झोपेची आवश्यकता असल्याच्या भूमिकेवर ती विश्वास ठेवते. या मोहिमेच्या माध्यमातून, सानिया आपला अनुभव सेंच्युरीच्या विविध मॅट्रेस उत्पादनांसह शेअर करणार आहे. निरोगी झोप आणि जीवनासाठी त्याचे बहुविध फायदे अधोरेखित करणार आहे.

ही मोहीम मायपॉवरमॅट संग्रह आणि ऑर्थो ॲक्टिव्ह मॅट्रेससारख्या फ्लॅगशिप उत्पादनांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांवर सादरीकरणासह डिझाइन केली गेली आहे. नव्याने सादर करण्यात आलेली मायपॉवरमॅट रेंज, ही मोठ्या आणि थकविणाऱ्या दिवसापासून मुक्तीसाठी सक्रिय ग्राहकाला लक्ष्य करते. या गाद्या प्रगत स्प्रिंग टेक्नॉलॉजी आणि कंटूर आकाराच्या फोमसह येतात. त्यामुळे वजन आणि तापमानाचे इष्टतम वितरण सुनिश्चित होते. त्याचप्रमाणे, सेंच्युरीच्या सर्वात यशस्वी वेलनेस कलेक्शनचा एक भाग असलेली ऑर्थो ॲक्टिव्ह मॅट्रेस परिपूर्ण बॅक सपोर्ट आणि चांगल्या आसनासह झोपेच्या उत्तम अनुभवाचे वचन देते.

सेंचुरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक प्रवक्ते उत्तम मलानी म्हणाले की, सनिया मिर्झाबरोबर ‘चॉइस ऑफ चॅम्पियन्स’ नावाची आमची नवीनतम मोहीम सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. तिची स्वतःची कथा आणि आदर्श आमच्या मूलभूत मूल्यांशी जुळलेले आहे. त्यामुळे आमच्या लक्ष्यित ग्राहकांमध्ये आमच्या ब्रँडचा संदेश वाढेल. आम्ही आमच्या सर्वात आवडत्या उत्पादनांद्वारे झोपेबाबतची जागरूकता वाढविण्याच्या हेतूने माहितीपूर्ण चित्रपट तयार करीत आहोत. आमच्या नवीनतम उत्पादनांसह मायपॉवरमॅट कलेक्शन, ऑर्थो ॲक्टिव्ह मॅट्रेस (वेलनेस कलेक्शन) आणि सेंच्युरी प्रोटेक्ट-अँटीमायक्रोबियल शील्ड यासारखे प्रॉडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचण्यास या मोहिमेमुळे बळ मिळेल.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content