Homeचिट चॅटआता आरामदायी गादीसाठी...

आता आरामदायी गादीसाठी कॉपर-जेल तंत्रज्ञानाचा वापर!

भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मॅट्रेसचा ब्रँड, सेंच्युरी मॅट्रेसेस, आता कॉपर-जेल तंत्रज्ञानाचा वापर केलेली पहिलीवाहिली गादी बाजारात आणण्यासाठी सज्ज झाला आहे.

मॅट्रेसेसमध्ये कॉपर-जेल तंत्रज्ञान वापरण्यासाठी सेंच्युरीने अमेरिकेतल्या प्रयोगशाळेच्या सहकार्यातून वर्षभरापेक्षाही जास्त काळ गहन संशोधन केले आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून भारतातील अव्वल ८ बाजारपेठांत ही संशोधन प्रक्रिया राबवण्यात आली. ग्रीन जेल तंत्रज्ञानातून कॉपर-जेल तंत्रज्ञानाकडे स्थलांतर करणारा पहिलाच ब्रँड म्हणून सेंच्युरीने भारताचा निद्रातज्ज्ञ असण्याच्या प्रतिबद्धतेप्रती आपली बांधिलकी अधिक मजबूत केली आहे.

नवे कॉपर जेल तंत्रज्ञान मॅट्रेसेसच्या पृष्ठभागाच्या तुलनेत शरीरातील उष्णता घटवण्यासाठी लाभदायक ठरेल. यामुळे ग्राहकांना शांत आणि उत्तम झोपेचा अनुभव मिळू शकेल. कॉपर जेलमध्ये निसर्गत: दाहविरोधी गुणधर्म असतो. यामुळे शरीरावरील ताण कमी होण्यात मदत मिळते.

तांबे हे नैसर्गिक आणि विषाणूरोधक प्रकृतीचे असते. शारीरिक सृदृढतेच्या दृष्टिकोनातून त्याचे मानवी आरोग्याला अनेकविध फायदेही होतात. थर्माजेलटीएम तंत्रज्ञान आणि तांब्यांचे विज्ञान यांच्या संयोगातून अतिशय आराम आणि दबावमुक्तीचा प्रत्यय येतो. हे नवे आणि सर्वोत्तम कॉपर-जेल तंत्रज्ञान आपल्या अजोड औष्मिक संवाहकतेच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वस्वी नवा अनुभव मिळवून देऊ शकते. ज्यात शरीर आणि मॅट्रेस यांच्यातील उष्णतेचे संतुलन साधले जाऊन विनाव्यत्यय झोपेचा आनंद घेता येईल.

सेंच्युरी मॅट्रेसेसचे कार्यकारी संचालक उत्तम मालानी म्हणाले की, आम्ही या तंत्रज्ञानाच्या संशोधन व विकासात एका वर्षापेक्षाही जास्त काळाची गुंतवणूक केली. अमेरिकेतल्या एका प्रयोगशाळेने भारतातील सर्वोत्तम ८ बाजारपेठांत हे संशोधन राबवले. त्याच्या अतिशय गहन विश्लेषणातून मॅट्रेसमध्ये कॉपर जेल तंत्रज्ञान वापरण्याच्या आमच्या स्वप्नांची पूर्तता झाली. सतत नवसंशोधन करून त्याचा ग्राहकांना जास्तीतजास्त फायदा करून देण्यावर आमचा विश्वास आहे.

या उद्योगक्षेत्रात सर्वात प्रथम मॅट्रेसमध्ये कॉपर जेल तंत्रज्ञान आणत ग्राहकांना आणखी सुखकर आणि आरोग्यदायक निद्रा उपलब्ध करून देण्याचा कटिबद्धतेचा आम्ही पुनरूच्चार करत आहोत. सातत्याने विकासित होणाऱ्या ग्राहकांच्या गरजांशी ते सुसंगत आहे. कॉपर जेल हे अभूतपूर्व तंत्रज्ञान ठरले आहे. ते या श्रेणीतील एक गुंतवणूकदार म्हणून आमची आघाडी प्रस्थपित करण्यासोबतच ग्राहकांच्या झोपण्याच्या अनुभवातही अमूलाग्र बदल घडवून आणणारे ठरेल, असेही ते म्हणाले.

आपल्या नैसर्गिक आणि विषाणूरोधी गुणधर्मांमुळे तांबे वापरण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. अभ्यास-संशोधनांतून सिद्ध झाले आहे की, तांबेयुक्त फोमचा वापर केल्यामुळे एस ऑरियस, ई कोली आणि मार्क्सियनससारख्या सूक्ष्मजीवांना पूर्णपणे प्रतिबंध होते. अशा या गुणकारी धातूचा मॅट्रेसमध्ये वापर करून तंत्रज्ञानीय नवकल्पना आणि ग्राहकभिमुखतेत सेंच्युरी मॅट्रेसेसने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content