Homeबॅक पेजमुंबई-सिंधुदूर्ग होणार एक्स्प्रेस...

मुंबई-सिंधुदूर्ग होणार एक्स्प्रेस वे होणार!

पर्यटन प्रकल्पाची एकही संधी सोडणार नसून समृद्धीप्रमाणेच मुंबई-सिंधुदूर्ग एक्स्प्रेस वे होणार आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

आज सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांतर्गत आखण्यात आलेल्या अनेक योजनांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा आज सावंतवाडी येथे पार पडला. या सोहळ्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार भरत गोगावले अशी मंडळी उपस्थित होती. यादरम्यान केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी कोकण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा आढावा घेतला.

काल नारायण राणेंसोबत मुख्यमंत्र्यांची सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांसंदर्भात तीन तास बैठक झाली. या उद्योग विभागांसाठी नारायण राणेंच्या एवढ्या योजना मी पाहिल्या की खर्‍या अर्थाने त्या घेण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या अनेक योजना नारायण राणेंकडे आहेत. महिला व तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी आखलेल्या अनेक योजनांची माहिती कालच्या बैठकीत नारायण राणेंनी दिली. एखादी वस्तू तयार झाल्यानंतर त्याचं मार्केटिंग, ब्रॅण्डिंग होणं गरजेचं आहे. त्या वस्तूला बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे याबाबतदेखील राणे साहेबांसोबत चर्चा झाली. यासाठीचे सर्व प्रयत्न राज्य व केंद्र सरकारकडून केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.

सावंतवाडीमध्ये आर्थिक विकासाला चालना देणारं शॉपिंग सेंटर विकसित करणं, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांच्या नावाचं ड्रेसिंग सेंटर उभारणं या कामांचं भूमीपूजन केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पर्यटन व्यवसायाला चालना देणारी ठिकाणं उभारणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे. अंबोली हिल स्टेशल उभारण्यासाठी राज्य सरकार योग्य ती मदत करेल. तसेच सिंधुरत्नच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव यांचं नाव देण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content