Homeबॅक पेजएसएससी परीक्षेत यंदाही...

एसएससी परीक्षेत यंदाही मुंबई महापालिकेला चंगले यश

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दहावीच्या चांगल्या निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२४मध्ये घेतलेल्या एसएससी परीक्षेसाठी पालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून एकूण १६ हजार १४० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९१.५६ टक्के इतका लागला आहे. 

महानगरपालिकेच्या ७९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यासह ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले ६३ विद्यार्थी आहेत. कुलाबा महानगरपालिका माध्यमिक शाळेमधील आयुष जाधव या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळवून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. द्वितीय क्रमांक खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेचा वरुण चौरसिया या विद्यार्थ्याने मिळविला असून, त्याला ९७.२० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तिसरा क्रमांक याच शाळेचा आदित्य वानखेडे या विद्यार्थ्याने मिळविला असून त्याला ९६ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

पालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा दहावीच्या निकालवृद्धीसाठी नियोजन करुन विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या व मोजक्या आशयावर आधारित ‘मिशन मेरिट पुस्तिके’ची निर्मिती करुन त्याचे वितरण केले. या पुस्तिका आणि त्यातील प्रश्न विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले. प्रश्न

एसएससी

सोडविण्याचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक सराव व्हावा यासाठी डिसेंबर २०२२पासून (विद्यार्थी नववीत असतानाच) दहावी परीक्षेच्या धर्तीवर शालेय स्तरावर पाच सराव प्रश्नपत्रिका पाहून व पाच सराव प्रश्नपत्रिका न पाहता अशा एकूण दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या.

महानगरपालिका शाळांचा दहावीचा विचार करता मार्च २०२०मध्ये ९३.२५ टक्के, मार्च २०२१मध्ये १०० टक्के, मार्च २०२२मध्ये ९७.१० टक्के, मार्च २०२३मध्ये ८४.७७ टक्के व या वर्षी मार्च २०२४मध्ये ९१.५६ टक्के निकाल  लागला आहे. गत वर्षी ४२ शाळांचा १०० टक्के निकाल लागला. या वर्षीं ७९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. गत वर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३ होती. यंदा त्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची वाढ होऊन ती ६३ झाली आहे.

सर्व शाळांना अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन देण्यात आले होते. तसेच अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शनही करण्यात आले. मुलांच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी वेळोवेळी दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात आल्या. शिक्षकांसाठी, विद्यार्थासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती त्याठिकाणी तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. पर्यवेक्षणीय अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन वेळोवेळी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचा परिणाम या निकालात जाणवला. 

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content