Wednesday, April 2, 2025
Homeकल्चर +'मुंबई लोकल' येत...

‘मुंबई लोकल’ येत आहे ११ जुलैला!

अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला “मुंबई लोकल” हा चित्रपट येत्या ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा प्रथमच पाहता येणार आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि आनंदी एंटरटेन्मेंट प्रस्तुत “मुंबई लोकल” या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेन्मेंटचे प्राची राऊत, सचिन अगरवाल हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे. असोसिएट प्रोड्युसर त्र्यंबक डागा, सहदिग्दर्शक विनोद शिंदे असून कलादिग्दर्शक सुमित पाटील आहेत. ऍक्शन सुनील रॉड्रिग्ज, निलेश गुंडाळे, कार्यकारी निर्माता हर्षवर्धन वावरे, देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

“मुंबई लोकल” या चित्रपटात मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेमध्ये घडणारी एक मनोरंजक प्रेमकहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. टाइमपास, टकाटक, बालक पालक अशा अनेक चित्रपटांतून अभिनेता प्रथमेश परबने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. ज्ञानदाच्या ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय ‘धुरळा’सारखे काही चित्रपटही तिनं केले आहेत. मुंबई लोकलच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक हलकीफुलकी, तरल प्रेमकथा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

असा वाचवा आपला घामाचा पैसा!

तुम्ही पगारदार नोकर आहात का? करदेयता कमी करण्याचा विचार करत आहात का? तर तुम्ही कायदेशीररित्या तुमचे करपात्र उत्पन्न कमी करू शकता आणि विविध वजावटीचा कोशल्यपूर्ण वापर करून आपल्या घामाचा पैसा वाचवू शकता. आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये करबचत पर्यायांचा जास्तीतजास्त फायदा...

बालकांना कायदेशीर दत्तक देण्यात महाराष्ट्र अव्वल

देशात बालकांची कायदेशीर दत्तक प्रक्रिया राबविण्यात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. सन २०२४-२५ या वर्षात सर्वाधिक ५३७ बालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांकडे संबंधित बालकांना सोपविण्यात आले. यामुळे या बालकांना हक्काचे ‘पालक’ व ‘घर’ मिळाले आहे, अशी भावना महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री अदिती...

किमान लाखाचे असेल शहर, तर धावेल बाईक टॅक्सी!

महाराष्ट्रात सर्वसामान्यांना सार्वजनिक प्रवास सुलभ आणि सुखकर करण्याकरीता राज्य सरकारने काल बाईक टॅक्सीच्या धोरणाला मंजुरी दिली. किमान एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लवकरच बाईक टॅक्सी धावणार आहेत. रस्त्यावरील वाहनसंख्या कमी होण्यासाठी खासगी दुचाकी वाहनांसाठी बाईक पुलिंगच्या पर्यायालासुद्धा शासनाने मान्यता...
Skip to content