Skip to content
Sunday, May 4, 2025
Homeटॉप स्टोरीजोडीदार निवडताना जास्तीतजास्त...

जोडीदार निवडताना जास्तीतजास्त पुरुषांना हवे प्रेम आणि रोमान्स!

विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना २९% महिला तसेच ४७% पुरुष प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ३९% महिला आपला जोडीदार सुसंगत असावा, याला अग्रक्रम देत असल्याचेही दिसून आले आहे. केवळ ११% अविवाहित असे आहेत, जे जोडीदाराची निवड करताना आर्थिक स्थैर्य हा सर्वात महत्त्वाचा घटक मानतात. जोडीदार निवडताना प्रादेशिक भेददेखील दिसून आला आहे. दिल्ली आणि मुंबईतील अविवाहितांच्या लेखी रोमान्सला महत्त्व आहे, तर बेंगळुरूमधील अविवाहित सुसंगततेवर भर देत असल्याचे दिसले.

जीवनसाथी, या मॅचमेकिंग प्लॅटफॉर्मने २१ हजारपेक्षा जास्त प्रतिसादकांच्या विचारांवर आधारित ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ नुकताच जारी केला. हा अहवाल भारतीय अविवाहितांमधील नात्यांसंबंधी बदलत्या प्राथमिकतांवर प्रकाश टाकतो. या निरीक्षणांमधून सूचित होते की, पुरुष जास्तकरून प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देतात, तर महिला जास्तकरून सुसंगततेला (कम्पॅटिबिलिटी) महत्त्व देतात. विवाह, आर्थिक स्थैर्य आणि जोडीदाराची निवड करण्यात माता-पित्याचा प्रभाव याबाबतीत बदलत चाललेल्या वृत्तीवरदेखील हा अहवाल प्रकाश टाकतो.

या अहवालात असेही आढळून आले की, ४०% अविवाहित योग्य जोडीदार मिळाल्यास परदेशी जायला तयार आहेत. हा पारंपरिक अपेक्षांमधील मोठा बदल आहे. परंतु, ७०% पालक मात्र अशी अपेक्षा करत आहेत की, आपल्या मुलांनी लग्न करून भारतातच राहवे किंवा भारतात परतावे. शहरानुसार या विचारसरणीत बदल होत असल्याचे दिसते. मुंबई, पुणे आणि बेंगळुरूमधील प्रतिसादकांनी एनआरआय जोडीदाराशी विवाहबद्ध होण्याची तयारी अधिक दर्शविली आहे. तर, दिल्लीतील अविवाहित मात्र भारतातच स्थायिक होण्याबाबत आग्रही दिसतात.

जीवनसाथीचे चीफ बिझनेस ऑफिसर रोहन माथुर म्हणाले की, भारतीय अविवाहित नातेसंबंधाच्या नियमांना नव्याने आकार देत आहेत. सुसंगततेला आणि व्यक्तिगत आवडी-निवडीला पारंपरिक अपेक्षांपेक्षा जास्त प्राधान्य देत आहेत. जीवनसाथीच्या ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’मध्ये ही बदलती विचारसरणी स्पष्ट दिसून येते. यामध्ये प्रेमाचे वाढते प्राधान्य दिसते. म्हणजेच सामाजिक दबावापेक्षा व्यक्तिगत मूल्यांशी निगडित प्रेमाला वाढती प्राथमिकता देण्यावर भर दिसून येतो. एक विश्वसनीय मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म म्हणून अर्थपूर्ण नाती जोडण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी अविवाहितांना सक्षम करण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत.

वय वर्ष २७च्या खालील अविवाहितांच्या मते, २७-३० हे विवाहबद्ध होण्यासाठीचे आदर्श वय आहे. परंतु वयाने मोठे असलेले प्रतिसादक आणि अनेक माता-पिता यांच्या मते मात्र योग्य जोडीदार मिळाल्यावर विवाह केला पाहिजे. हा विवाहयोग्य वयाच्या बाबतीतील एक अधिक लवचिक दृष्टिकोन आहे. लग्नावर होणाऱ्या खर्चात समान आर्थिक विभागणीची अपेक्षा या सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे. सुमारे ७२% अविवाहित मानतात की, खर्च दोन्ही जोडीदारांमध्ये वाटला गेला पाहिजे. फक्त १७% अविवाहितांना असे वाटते की, ज्यांना थाटामाटात लग्न करायची इच्छा असेल, त्यांनी स्वतःच हा खर्च केला पाहिजे. विचारातील हा बदल पालकांनादेखील मान्य आहे. एका बाजूच्याच पक्षावर आर्थिक बोजा येण्याच्या पारंपरिक पद्धतीपासून दूर जाण्याचा संकेत यातून मिळतो.

माता-पिता आता मुख्यतः विश्वसनीय सल्लागार बनले आहेत आणि निर्णय घेण्याचा अधिकार मोठ्या प्रमाणात स्वतः उपवर मुला-मुलीकडे आहे. फक्त ४% प्रतिसादकांनी सांगितले की, त्यांचे आई-वडील त्यांच्या पसंतीचा जीवनसाथी निवडतील. यावरून विवाहविषयक निर्णय घेण्यातील स्वायत्ततेचे वाढते प्रमाण दिसून येते. जोडी जुळवताना ज्योतिषशास्त्रासंबंधी दृष्टिकोन सतत बदलत आहे. दिल्लीतील प्रत्येक तीनपैकी एक प्रतिसादक असे मानतो की कुंडली जुळवणे महत्त्वाचे आहे. मात्र मुंबईतील अविवाहित कुंडली जुळवण्यापेक्षा व्यक्तिगत सुसंगततेला प्राधान्य देताना दिसतात. आधुनिक नात्यांत संतुलन आणि व्यक्तिगत ध्येये आणि मूल्ये यांची कास न सोडता प्रेम शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या प्राथमिकता बदलत आहेत.

Continue reading

‘सजना’चे ‘आभाळ रातीला..’ प्रेक्षकांसमोर!

शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित सजना चित्रपटातील "आभाळ रातीला" या नवीन गाण्याने रसिकांच्या हृदयाला नवा स्पर्श दिला. प्रेम, नातेसंबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट "सजना" या चित्रपटातील नवीन गाणं "आभाळ रातीला" प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम...

मुंबई महापालिकेकडून आजपासून पाळीव प्राण्यांची विष्ठाही संकलित

वापरलेले सॅनिटरी पॅडस्, डायपर, कालबाह्य औषधी आदींच्या संकलनासाठी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा संकलन सेवेची व्याप्ती आता वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत आजपासून पाळीव प्राण्यांची विष्ठा आणि इतर विशेष कचऱ्याच्या संकलनाची सेवा सुरू करण्यात आली...

ईश्वरी भिसेंच्या बाळांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री निधीतून २४ लाख!

पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात प्रसूतीनंतर मरण पावलेल्या ईश्वरी भिसे यांची जुळी मुलेही आज सुरक्षित जीवनासाठी संघर्ष करत असून त्यांच्या या संघर्षमय प्रयत्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सढळ हस्ते साथ दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतून या जुळ्या बालकांवरील उपचारांकरीता २४...