Homeन्यूज अँड व्ह्यूजयुपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातले...

युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातले 87हून अधिक उमदेवार यशस्वी

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी महाराष्ट्रातल्या 87हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून देशात त्यांनी 42वा क्रमांक पटकाविला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी  81 वा क्रमांक पटकावला आहे.

एक नजर निकालावर

समीर खोडे (४२), नेहा राजपूत (५१), अनिकेत हिर्डे (८१), विनय पाटील (१२२), विवेक सोनवणे (१२६), तेजस सारडा (१२८), जान्हवी शेखर (१४५), आशिष पाटील (१४७), अर्चित डोंगरे (१५३), तन्मयी देसाई (190), ऋषिकेश ठाकरे (२२४), अभिषेक टाले (२४९), समर्थ शिंदे (२५५), मनीषा धारवे (२५७), शामल भगत (२५८), आशिष उन्हाळे (२६७), शारदा मद्येश्वर (२८५), निरंजन जाधवराव (२८७), समीक्षा म्हेत्रे (३०२), हर्षल घोगरे (३०८), वृषाली कांबळे (३१०), शुभम थिटे (३५९), अंकेत जाधव (३९५), शुभम बेहेरे (३९७), मंगेश खिलारी (४१४), मयूर गिरासे (४२२), अदिती चौगुले (४३३), अनिकेत कुलकर्णी (४३७), क्षितिज गुरभेले (४४१), अभिषेक डांगे (452), स्वाती राठोड (४९२), लोकेश पाटील (४९६), सागर भामरे (५२३), मानसी साकोरे (५३१), नेहा पाटील (५३३), युगल कापसे (५३५), हर्षल महाजन (५३९), अपूर्व बालपांडे (५४६), शुभम पवार (५६०), विक्रम जोशी (593),  प्रियंका मोहिते (595), अविष्कार डेरले (604), केतन इंगोले (६१०), राजश्री देशमुख (६२२) संस्कार निलाक्ष गुप्ता (६२९) सुमित तावरे (655) सुरेश लीलाधरराव बोरकर (६५८) अभिषेक अभय ओझर्डे (६६९) नम्रता घोरपडे (675) जिज्ञासा सहारे (681) श्रृति कोकाटे (685)  अजय डोके(687) सूरज प्रभाकर निकम (706) श्वेता गाडे (711) अभिजित पखारे (720) कृणाल अहिरराव (732) हिमांशु टेभेंकर (738) सुमितकुमार धोत्रे (750) गौरी देवरे (759) प्रांजली खांडेकर (७६१) प्रितेश बाविस्कर (767) प्रशांत डांगळे (775) प्रतिक मंत्री (786) मयुरी माधवराव महल्ले (७९४) राहुल पाटील (804), सिध्दार्थ तागड (809), प्राजंली नवले (815), सिध्दार्थ बारवळ (823), ओमकार साबळे (844), प्रशांत भोजने (८४९), प्रतिक बनसोडे (862), चिन्मय बनसोड (893), निखील चव्हाण (900), विश्वजीत होळकर (905), अक्षय लांबे (908), निलेश डाके (918), किशनकुमार जाधव (923), ऐश्वर्या उके (९४३), स्नेहल वाघमारे (945), शुभम डोंगरदिवे (९६३), गौरव टेंभुर्णीकर (९६६), मयांक खरे (९६८), शिवानी वासेकर (९७१), श्रावण देशमुख (९७६), श्रुती श्रोते (९८१), सुशीलकुमार शिंदे (९८९), आदित्य बामणे (१०१५).

युपीएससी

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी ते एप्रिल 2024दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून 347, आर्थिक मागास प्रवर्गातून 115, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून 303, अनुसूचित जाती प्रवर्गातून 165, अनुसूचित जमाती प्रवर्गातून 86 उमेदवारांचा समावेश आहे.

एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 37 दिव्यांग उमेदवारांचा (16 ऑर्थोपेडिकली अपंग, 06 दृष्टीहीन, 05 श्रवणदोष आणि 10 एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 240 उमेदवारांची आरक्षित सूची तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट 120, आर्थिक मागास प्रवर्ग 36, इतर मागास वर्ग 66, अनुसूचित जाती 10, अनुसूचित जमाती 04  उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण चार दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण 180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट– 73, आर्थिक मागास प्रवर्ग- 17, इतर मागास वर्ग– 49, अनुसूचित जाती– 27, अनुसूचित जमाती- 14 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण 37 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट– 16, आर्थिक मागास प्रवर्ग- 04,  इतर मागास वर्ग- 10, अनुसूचित जाती– 05, अनुसूचित जमाती– 02 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण 200 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून 80, आर्थिक मागास प्रवर्गात 20, इतर मागास प्रवर्गातून 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून 32 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अमध्ये एकूण 613 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून 258, आर्थिक मागास प्रवर्गातून 64, इतर मागास प्रवर्गातून 160, अनुसूचित जाती प्रवर्गातून 86 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 45 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट बमध्ये एकूण 113 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून 47, आर्थिक मागास प्रवर्गातून 10, इतर मागास प्रवर्गातून 29, अनुसूचित जाती प्रवर्गातून 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 12 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 355 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content