Homeचिट चॅटसंजय मुळेंना महाराष्ट्रभूषण...

संजय मुळेंना महाराष्ट्रभूषण जीवनगौरव  पुरस्कार

छत्रपती संभाजी नगर येथील साई इंटरप्रायझेसचे मालक संजय मुळे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी “महाराष्ट्र  भूषण जीवन गौरव” पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. जयपूर येथे झालेल्या एक्सलंसी आयकॉनिक पुरस्कार वितरण समारंभात प्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेल्या थ्री फिंगर्स इंटरटेनमेंट लि.च्या वतीने फाव फेअर्स या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी एक्सलन्सी आयकॉनिक अवॉर्ड पुरस्काराचे आयोजन केले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा एक्सलंसी आयकॉनिक पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यामध्ये छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत असलेल्या साई इंटरप्रायझेसचे सर्वेसर्वा संजय मुळे यांची उद्योग क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव” पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

यापूर्वी  संजय मुळे यांचा  एक्सलंसी आयकॉनिक अवॉर्डतर्फे “उद्योगश्री जीवन गौरव”, नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या “नॅशनल इंडस्ट्रीयल एक्सलंस पुरस्कार”, क्वालिटी ब्रॅण्ड टाइम्सतर्फे “क्वालिटी ब्रँड इंडिया पुरस्कार”, एज्युकेशन अँड ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचा “राष्ट्रीय निर्माणरत्न पुरस्कार”, अशा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content