Homeचिट चॅट१० ते १२...

१० ते १२ जूनमध्ये ‘मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सपो’!

ट्रेडइंडिया या देशातील आघाडीच्या बी२बी ऑनलाइन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मने मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सपो इंडिया २०२१, या नवव्या भव्य व्हर्चुअल इव्हेंटच्या आयोजनाची तयारी केली आहे.

१० ते १२ जूनदरम्यान होणाऱ्या या मेडिकल प्रदर्शनात मेडिकल व आरोग्य सेवा उत्पादन, हॉस्पिटल व मेडिकल पुरवठादार, फार्मास्युटिकल्स ड्रग्ज अँड मेडिसिन्स तसेच इतर आरोग्य व सौंदर्य उत्पादनांमधील भारतीय निर्माते, पुरवठादार आणि निर्यातदार यांना नव्या बिझनेस भागीदारीची संधी शोधण्याकरिता तसेच आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवण्याकरिता मदत केली जाईल.

ट्रेडइंडिया डॉटकॉमचे सीईओ संदीप छेत्री म्हणाले की, महामारीच्या या निराशाजनक काळात देशातील आरोग्यसेवा क्षेत्रासाठी व्हर्चुअल मेडिकल एक्सपोचे आयोजन करणे हे ट्रेडइंडियाचे सामाजिक कर्तव्य असून आम्ही ते पार पाडत आहोत. महामारीदरम्यान, असंख्य उत्पादक आणि पुरवठादारांना अत्यावश्यक मेडिकल साधने आणि प्रणाली पुरवण्यासाठी देशातील आरोग्यसेवा मजबूत होईल. एवढेच नाही तर, या प्राणघातक विषाणूविरुद्ध लढा देणाऱ्या देशातील लोकांना आणखी संधी मिळेल.

अथक प्रयत्नांतून महामारीशी लढा देण्याच्या उद्देशाने ट्रेडइंडिया भारतीय मेडिकल पुरवठादार आणि उत्पादकांना जागतिक आणि खऱ्या खरेदीदारांशी डिजिटली कनेक्ट होण्यास, व्हिजिटर्सना उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करण्यास, बिझनेस पार्टनरशिप आणि चॅनल्स तयार करण्यास मदत करेल. तसेच पात्र नेतृत्त्व निर्माण करणे, वितरक नियुक्त करणे तसेच भारतातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या व्हर्चुअल मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सपोमध्ये प्रदर्शन करण्याची संधी यातून मिळेल, असेही ते म्हणाले.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content